आयटीएफ महिला टेनिसमध्ये पुण्याची ऋतुजा दुहेरीत अजिंक्य
By Admin | Updated: July 17, 2017 04:18 IST2017-07-17T04:18:09+5:302017-07-17T04:18:09+5:30
पुण्याची आंततराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने इजिप्तमध्ये झालेल्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत दुहेरी प्रकारात विजेतेपद प्राप्त केले.

आयटीएफ महिला टेनिसमध्ये पुण्याची ऋतुजा दुहेरीत अजिंक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याची आंततराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने इजिप्तमध्ये झालेल्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत दुहेरी प्रकारात विजेतेपद प्राप्त केले.
या स्पर्धेत ऋतुजा आणि कनिकाही भारतीय जोडभ बिगर मानांकित म्हणून खेळली. अंतिम फेरीत त्यांनी जर्मनीची लिंडा प्रेनकोविचआणि आॅस्ट्रेलियाची येलेना स्टोआआनोविच यांच्या जोडीला ६-२, ६-४ असे पराभूत करीत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याआधी उपांत्यपूर्व लढतीत भारतीय जोडीने खळबळजनक विजयाची नोंद करताना जॅकलिन अॅवाड-डेप्सिना या अव्वल मानांकित जोडीला स्पर्धेबाहेर केले होते. त्यानंतर उपांत्य लढतीत ऋतुजा-कनिका यांनी लॉरा अशली-रामू उएदा यांचे आव्हान ६-१, ७-६ (५)ने संपुष्टात आणले होते.