पूर्व हवेलीत पावसाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST2021-07-21T04:08:56+5:302021-07-21T04:08:56+5:30
खरीप हंगाम हा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या हंगामात पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी शेतातल्या पिकांच्या पेरण्या पूर्ण करतात. मात्र ...

पूर्व हवेलीत पावसाला सुरुवात
खरीप हंगाम हा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या हंगामात पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी शेतातल्या पिकांच्या पेरण्या पूर्ण करतात. मात्र या वर्षी च्या पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.
या परिसरातील खोडवा ऊस पिकाची वाढ खुंटल्याचे आढळून आले. पावसावरती पेरणी केलेल्या पिकांना पोषक वातावरण मिळाले असून शेतकऱ्याची चिंता कमी होताना दिसून येत आहे. बाजरी, मूग, उडीद, मटकी, भूईमुगाच्या पेरणीवर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
या भागात पावसाला जोर नसला तरी पावसाळी वातावरण आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत आहे.