शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पत्नी अन् मुलांना सांभाळणे ही पतीची नैतिक जबाबदारी..!; दरमहा २० हजार रुपये पोटगीचा आदेश

By नम्रता फडणीस | Updated: November 25, 2024 15:37 IST

पुणे : पत्नीचा सांभाळ करणे ही पतीची नैतिक जबाबदारी आहे. पतीचे नोकरीसह शेतीतून चांगले उत्पन्न असल्याचे दिसून येत आहे. ...

पुणे : पत्नीचा सांभाळ करणे ही पतीची नैतिक जबाबदारी आहे. पतीचे नोकरीसह शेतीतून चांगले उत्पन्न असल्याचे दिसून येत आहे. उदरर्निवाह आणि दोन्ही लहान मुलांच्या संगोपनासाठी तिला पैशांची गरज असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी आदेश दिला.

राकेश आणि स्मिता (नावे बदलली आहेत) दोघे एकाच ठिकाणी शिकत होते. दोघांचे प्रेम जमले आणि त्यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये विवाह केला. त्यातून दोघांना दोन मुले आहेत. काही वर्षे सुरळीत संसार केल्यानंतर राकेशने स्मिताला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. त्याने दुसरा विवाह केल्याचे तिला आढळून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला कोंडून ठेवले. त्यानंतर त्रास देऊन तिला माहेरी जाण्यास भाग पाडले.त्यामुळे तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला. यामध्ये स्मिताने पोटगीची मागणी केली आहे. तिच्या वतीने कौटुंबिक न्यायालय येथील द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष अँड. कल्पना निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली. अर्जदार यांचे तुटपुंजे उत्पन्न आहे. राकेश दोन्ही मुलांना सांभाळण्याची नैतिक जबाबदारी टाळत आहेत. तो नोकरी करत असून, चांगला पगार आहे. शिवाय शेतीतून आणि घरातील इतर व्यक्तींचेही चांगले उत्पन्न आहे. त्यामुळे दरमहा ३५ हजार् रुपये पोटगीची मागणी केली. यास पतीने विरोध केला.ती नोकरी करत असल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, त्याने दाखल केलेल्या पुराव्यावरून तिचे उत्पन्न तुटपुंजे असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक खर्च, उदरनिर्वाहसाठी पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला.तसेच, ती राहत असलेल्या ठिकाणी, माहेरी, अथवा रस्त्यावर कुठेही तिला शिवीगाळ, दमदाटी करू नये. न्यायालयाच्या परवानगी शिवाय परस्पर मुलांना घेऊन जाऊ नये,असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयFamilyपरिवारhusband and wifeपती- जोडीदार