शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान अर्धवट कामांच्या उदघाटनासाठी येणे हे आपले दुर्दैव; पुण्यातून राष्ट्रवादीची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 23:38 IST

राष्ट्रवादी करणार मूक आंदोलन

पुुणे : पाच राज्यांतील निवडणूकांचा प्रचार करून वेळ मिळाल्यावर आता  नरेंद्र मोदी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पुण्यात येत आहेत. मेट्रोचे काम अर्धवट झालेले असताना पंतप्रधानांना बोलवून शहर भाजपा त्यांची दिशाभूल करून पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत गेली.जगताप म्हणाले, एकीकडे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून अर्धवट विकासकामांच्या उदघाटनासाठी पुण्यात येत आहेत. त्यांचा निषेध काळे झेंडे न दाखवता मूक आंदोलनाने करण्यात येणार आहे.' राष्ट्रवादीतर्फे पंतप्रधानांच्या निषेधार्थ काही व्हिडीओ प्रसारित केले जाणार आहेत. पालकमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित राहणार असले तरी राष्ट्रवादीतर्फे मूक आंदोलन केले जाणार आहे.'मेट्रोचे ३१ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान उदघाटनासाठी आले असते, तर आम्हाला आनंदच झाला असता. ५ किमीच्या मार्गाच्या उदघाटनासाठी येणे म्हणजे शहरातील फुलराणीच्या उदघाटनसाठी येण्यासारखे आहे आणि हे पहावे लागणे हे आपले दुर्दैव आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपचे शहराध्यक्ष म्हणजे पोस्टरबॉय 

"भाजपा शहराध्यक्षानी शहरात पोस्टरबाजी चालवली आहे. पोस्टर बॉय होण्यापेक्षा त्यांनी तिकिट वाटपाचा हक्क आपल्याकडून का काढून घेतला याचा विचार करावा आणि ते परत मिळवावेत, तरच त्यांना शांत झोप लागेल, असा टोला जगताप यांनी लगावला."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस