गरजू व्यक्तीची क्षुधा भागवणे पुण्यकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:27+5:302021-02-05T05:20:27+5:30

हडपसर : अन्न हे पूर्णब्रह्म आहे. एखाद्या गरजू व्यक्तीची क्षुधा भागवणे हे पुण्यकार्य आहे. हे कार्य राजाभाऊ होले व ...

It is a good deed to satisfy the hunger of a needy person | गरजू व्यक्तीची क्षुधा भागवणे पुण्यकार्य

गरजू व्यक्तीची क्षुधा भागवणे पुण्यकार्य

हडपसर : अन्न हे पूर्णब्रह्म आहे. एखाद्या गरजू व्यक्तीची क्षुधा भागवणे हे पुण्यकार्य आहे. हे कार्य राजाभाऊ होले व त्यांचे सहकारी लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून करीत आहेत, असे मत संतशिरोमणी सावता माळी यांचे १७ वे वंशज रविकांत महाराज वसेकर यांनी व्यक्त केले.

तुकाईदर्शन येथे लोककल्याण प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत असलेल्या लोककल्याण अन्नपूर्णा योजनेच्या १४ व्या लाभार्थी रेणुका जनार्दन बळते यांना वसेकर यांच्या हस्ते किराणा साहित्य वाटप करण्यात आले. व्यासपीठावर शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक गणेश ढोरे, लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष दिलीप भामे, सचिव विनोद सातव, कोषाध्यक्ष प्रदीप जगताप, कार्यकारिणी सदस्य प्रभाकर शिंदे, राहुल भाडळे, इंद्रपाल हत्तरसंग, लोककल्याण पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे, उद्योगपती विशाल कामठे उपस्थित होते.

संजय मोरे म्हणाले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू महिलांना गेली १४ वर्षे दरमहा किराणा वाटप करणारी योजना लोककल्याणकारी आहे. राजाभाऊ होले यांचे कार्य समाजाप्रती असलेले सामाजिक दायित्व सिद्ध करते.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे. एखाद्या गरजू व्यक्तीची क्षुधा भागवणे हे पुण्यकार्य आहे. हे कार्य राजाभाऊ होले व त्यांचे सहकारी लोककल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून करीत आहे, असे मत रविकांत महाराज वसेकर यांनी व्यक्त केले.

फोटो : तुकाई दर्शन येथे लोककल्याण अन्नपूर्णा योजनेच्या १४ व्या लाभार्थी रेणुका जनार्दन बळते यांना रविकांत महाराज वसेकर यांच्या हस्ते किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

Web Title: It is a good deed to satisfy the hunger of a needy person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.