पुण्यात म्हैस उधळल्याने आयटी इंजिनियर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST2021-08-27T04:16:41+5:302021-08-27T04:16:41+5:30
पुणे : मोटारसायकलवरून जात असताना एक म्हैस अचानक उधळली आणि तिने पत्नीसह जाणाऱ्या आयटी तरुणाला जोरात धडक दिली. या ...

पुण्यात म्हैस उधळल्याने आयटी इंजिनियर जखमी
पुणे : मोटारसायकलवरून जात असताना एक म्हैस अचानक उधळली आणि तिने पत्नीसह जाणाऱ्या आयटी तरुणाला जोरात धडक दिली. या घटनेत आयटी इंजिनियर जखमी झाला असून, लष्कर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जुबेर अस्लम शेख (वय ३८, रा. नीलकंठ विहार सोसायटी, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शहनवाज अब्दुल कुरेशी, सदाकत कुरेशी, नदाकत कुरेशी (रा. कॅम्प) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महंमद स्ट्रीट रोडवरील कुरेशी दरबारजवळ ८ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे चारला घडली.
जुबेर शेख हे आयटी कंपनीत इंजिनियर आहेत. ते पत्नीसह दुचाकीवरून महंमद स्ट्रीट रस्त्यावरून जात होते. त्यावेळी कुरेशी हे गवळी असून त्यांचा गोठा आहे. ते म्हशींना घेऊन जात हाेते. त्यावेळी एक म्हैस अचानक उधळली व तिने दुचाकीवरील शेख यांना धडक दिली. त्यात शेख जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.