शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटी' कर्मचाऱ्यांना हवी मतदानासाठी सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:35 IST

लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. मात्र आयटी कंपन्यामधील कर्मचा-यांना या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावणे हा भारतीय दंडविधान कलम 135 बी चा भंग

पुणे : मतदानाच्या दिवशी आयटी कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यात येत असली तरी तरी महत्वाचे प्रोजेक्ट असल्याचे कारण पुढे करीत अनेक कंपन्या कर्मचा-यांना मतदानाच्या दिवशी देखील कामावर येण्यास भाग पाडतात. त्यामुळे पुण्याबाहेरील कर्मचा-यांना मतदानापासून वंचित राहावे लागते. आयटीमधील केवळ 60 टक्केच कर्मचारीच मतदानाचा हक्क बजावू शकतात, याकडे लक्ष वेधत सर्व कर्मचा-यांना  मतदानाचा हक्क मिळण्याकरिता ऑल इंडिया फोरम फॉर आयटी/आयटीज एम्प्लॉईज, ( फाईट) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कामगार सहआयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.      लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. मात्र आयटी कंपन्यामधील कर्मचा-यांना या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. संपूर्ण देशभरात जवळपास 56 लाख आयटी कर्मचारी आहेत. स्वत:चे गाव सोडून अनेक कर्मचारी नोकरीसाठी अनेक ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. पुण्यातही जवळपास 5 ते 6 लाख कर्मचारी स्थायिक आहेत. त्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी हे महाराष्ट्रातल्या विविध भागातून आले आहेत. हे कर्मचारी दुस-या भागात स्थलांतरित झाले असले तरी त्यांचे नाव मूळ गावच्याच मतदारयादीत आहे. त्यामुळे मतदानासाठी त्यांना मूळ गावी जाणे भाग आहे. आयटी कंपन्यांकडून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येत असली तरी महत्वाचे प्रोजेक्ट असल्याचे कारण सांगत कर्मचा-यांना कंपनीमध्ये बोलावले जाते आणि वेळ मिळेल तसे मतदान करूया असे सांगितले जाते. मतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावणे हा भारतीय दंडविधान कलम 135 बी चा भंग आहे. परंतु कामावर बोलावल्यामुळे पुण्याबाहेरील कर्मचा-यांना मतदानाला मुकावे लागते. कर्मचा-यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी कामगार सहआयुक्त निखिल वाळके यांनी निवेदन देण्यात आल्याची माहिती फाईटचे प्रदेशाध्यक्ष परमजित माने यांनी दिली.------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान