पगार मिळत नसल्याने शिक्षकांचे जगणे अवघड
By Admin | Updated: October 30, 2015 00:11 IST2015-10-30T00:11:33+5:302015-10-30T00:11:33+5:30
राज्याच्या शिक्षण विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून अर्धवेळ, तासिका तत्वावरील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही

पगार मिळत नसल्याने शिक्षकांचे जगणे अवघड
पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून अर्धवेळ, तासिका तत्वावरील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. वेळेत वेतन मिळावे याबाबत शासनाकडून कोणत्याही सकारात्मक हालचाली झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी शिक्षकांचे जगणे अवघड झाले आहे. दिवाळीत त्यांच्यावर शिमगा साजरा करण्याची वेळ येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला वेतनाचा प्रश्न शासनाने मार्गी लावाला, अशी अपेक्षा शिक्षक व शिक्षकेतर संघटनाकडून केली जात आहे.
शासनाने आॅनलाईन संच मान्यतेची प्रक्रिया सुरू केली. मात्र, संच मान्यतेचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. सणानिमित्त काही दिवस अगोदर वेतन दिले जाते. दिवाळी साजरी करण्यासाठी वेतन मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)