दुपार्पयत होणार निकाल स्पष्ट

By Admin | Updated: October 17, 2014 00:05 IST2014-10-17T00:05:22+5:302014-10-17T00:05:22+5:30

मतदानानंतर प्रशासन आता रविवारी (दि. 19) होत असलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे.

It is clear that the results will be held till noon | दुपार्पयत होणार निकाल स्पष्ट

दुपार्पयत होणार निकाल स्पष्ट

पुणो : मतदानानंतर प्रशासन आता रविवारी (दि. 19) होत असलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार असून, जिल्ह्यातील 21 मतदारसंघांचे चित्र दुपार्पयत स्पष्ट होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.  
मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 21 टेबल असून, एक टेबल टपाली मतदानाच्या मोजणीसाठी असणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षकही लक्ष ठेवणार आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्याची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. फेरीनिहाय मतांची माहिती आयोगाला पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा एक फेरी पूर्ण झाल्यावरच दुसरी फेरी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रत्येक फेरीसाठी साधार वीस मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे. 
एका मतमोजणी टेबलावर एक मतमोजणी निरीक्षक, सहायक मतमोजणी निरीक्षक, मतमोजणी सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक 
असा फौजफाटा असणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिका:यांनी सांगितल़े  दरम्यान मतमोजणीच्या अधिकारी आणि कर्मचा:यांना 
गुरुवारी (दि. 16) प्रशिक्षण 
देण्यात आले असून, शनिवारी 
(दि. 18) अंतिम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 
मतमोजणी बालेवाडी, कोरेगाव पार्क येथे 
पुणो शहरातील वडगावशेरी, शिवाजीनगर, पुणो कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ, हडपसर आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. कोथरुड, खडकवासला, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या पाच विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी-म्हाळुंगे येथील क्रीडा संकुलात, तर ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातील मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांसह एसआरपीएफचे जवानही  तैनात असतील. 

 

Web Title: It is clear that the results will be held till noon