वाढीव वीज बिलांचा प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:40+5:302021-09-06T04:14:40+5:30
नसरापूर : शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणींचा सामना करीत तो ...

वाढीव वीज बिलांचा प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावणार
नसरापूर : शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणींचा सामना करीत तो एकत्र येऊन पाणीपुरवठा संस्था उभारतो. तरीही शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातून महावितरणने वीज बिलात दरवाढ करून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे केल्याने सर्व पाणीसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर काही बंद पडल्या आहेत. याकरिता पाणी संस्थांना वीज बिलात इतर संस्थांप्रमाणे अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करू असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
भोर तालुक्यातील धांगवडी येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूर व पुणे जिल्हा सर्वपक्षीय शेतकरी मेळावा येथील छत्रपती शिवाजीराजे इंजिनिअरिंग कॉलेज येथे वीज बिल दरवाढीच्या विरोधात शेतकरी मेळाव्यात आमदार थोपटे बोलत होते. कार्यक्रमास यावेळी कागलचे माजी आमदार संजय घाटगे पाटील, विक्रांत पाटील , आर. जी. तांबे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक मोहन जगताप, अंकुश जगताप, ज्येष्ठ पत्रकार एस. जी. शेलार, राजगड कारखान्याचे संचालक दिनकरराव धरपाळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, संचालक शंकर धाडवे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, राजगड पाणीपुरवठा संस्थेचे सुभाष शिळीमकर आदी उपस्थित होते.
महावितरणने वाढीव वीज बिल आकारणी केली असली तरी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूर व पुणे या संघटनेच्या मदतीने शेतकऱ्यांना वाढीव वीज बिलामध्ये शासन अनुदान पूर्ववत मिळवून देऊन वीज बिलांचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असा दिलासा आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. गेल्या जून २०२१ पासून महावितरण कंपनीने महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने वीज बिल युनिट दर रु. १.१६ वरून रु. ४.२५ याप्रमाणे आकारणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यापुढे शासन अनुदान पूर्ववत मिळविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाणीव करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वीज बिल दरवाढविरोधी शेतकरी आंदोलनात उपस्थित माजी आमदार संजय घाटगे पाटील, आमदार संग्राम थोपटे, विक्रांत पाटील, आर. बी. तांबे यांनी सवलतीच्या दरात २४ तास वीज मिळावी यासाठी विशेष प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचे आश्वासन दिले.
०५ भोर मेळावा
धांगवडी येथील शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार संग्राम थोपटे.
050921\185-img-20210905-wa0025.jpg
???? ???? ? ?? : ??????? (??. ???) ????? ?????? ????????? ??? ?????????? ??????????? ?????????? ?????? ????? ??????? ????,???? ????? ???? ????? ????? ??? ???????.