शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

पुण्यातील नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 13:25 IST

मराठी नाट्य-सिने कलाकारांनी यापुर्वी व्यक्त केली याबाबत सोशल मीडियावरुन नाराजीही यापुर्वी व्यक्त केलेली

ठळक मुद्देमनुष्यबळाची कमतरता केव्हा होणार दूर : पुरेसे पाणी देण्याची आवश्यकता 

लक्ष्मण मोरे -

पुणे : भिंतींना आलेले पोपडे, उडालेला रंग, तुंबलेली आणि अस्वच्छ स्वच्छतागृहं, बेसिनमध्येपडणाऱ्या पिचकाऱ्या ही आहे नाट्यगृहांमधील स्वच्छतेची अवस्था! नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त राहिला आहे. मराठी नाट्य-सिने कलाकारांनी याबाबत सोशल मीडियावरुन नाराजीही यापुर्वी व्यक्त केलेली आहे. अलिकडच्या काळात तर चौदा नाट्यगृहांमध्ये पाण्याची समस्या उद्भवली आहे. पाणी कमी पडू लागल्याने स्वच्छतेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. पालिकेच्या चौदा नाट्यगृहांमध्ये असलेली स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याची तक्रार अनेकदा प्रेक्षकांकडून केली जाते. नाट्यगृहांची आसनक्षमता ७०० पासून अडीच हजारांपर्यंत आहे. यातील गणेश कला मंचाची आसनक्षमता सर्वाधिक अडीच हजार आहे. नाटके, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांसोबतच लावण्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. त्यातही लावण्यांच्या कार्यक्रमाला सर्वाधिक गर्दी असते. मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असल्याने त्या प्रमाणात अस्वच्छताही होते. परंतू, मनुष्यबळाची आणि पाण्याची कमतरता असल्याने वेळीच आणि पुरेशी स्वच्छता करण्यात व्यवस्थापन कमी पडते. नाट्यगृहांमध्ये झाडणे, पुसणे आणि स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकरिता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. परंतू त्यांची संख्या अपुरी आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि साधनसामुग्रीही मर्यादित आहे.  त्यामुळे स्वच्छतेच्या कामांवरही त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळते. 

याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष केले जाते. आवश्यक साधने पुरविणे आणि वारंवार स्वच्छता ठेवणे याकडे जाणिवपुर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. परंतू, नाट्यगृहांच्या कामांना अधिकाºयांकडून दुय्यम समजले जात असल्याने त्यांच्या लेखी हा विषय  ‘प्रायोरिटी’चा नसतो. पुण्यासह राज्यभरातून येणाºया हजारो नाट्यरसिकांना चांगल्या सुविधा देण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतागृहांसोबतच आवारातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापनावरही लक्ष देणे आवश्यक आहे. 
=====रंगमंच सहायकाची रिक्त पदे कधी भरणार?नाट्यगृहांमधील रंगमंच सहायकांची पदे कधी भरणार असा प्रश्न आहे. पालिकेच्या चौदा नाट्यगृहांसाठी ७० पेक्षा अधिक रंगमंच सहायकांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीमध्ये अवघे ४० रंगमंच सहायक आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे. काही महिन्यांपुर्वी कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये एका रंगमंच सहायकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. रिक्त असलेली उर्वरीत ३० पदे भरली जाणे आवश्यक आहे. .........नाट्यगृहांची नाटके (मालिका भाग - २) जोड

======नाट्यगृहांच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक, कनिष्ठ अधिक्षक दर्जाच्या अधिकाºयांची तब्बल १५ पदे रिक्त आहेत. ही वरिष्ठ पातळीवरील पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम नाट्यगृहांच्या व्यवस्थापनावर होत आहे. कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी नाट्यगृहांमध्ये अधिकाºयांची ‘भूमिका’ निभावत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या कर्मचाºयांची मक्तेदारी झाल्यासारखी परिस्थिती असून या कर्मचाºयांच्या कामामध्ये बदल केल्यास हे कर्मचारी नगरसेवक अथवा राजकीय दबाव स्थानिक अधिकाºयांवर आणतात. रिक्त पदे भरण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर वारंवार पत्र व्यवहार करुनही रुल्स अ‍ॅन्ड रेग्यूलेशनचे (आरआर) कारण देत चालढकल करण्यात येत आहे.======नाट्यगृहांमधील दुरु स्तीवर तीन वर्षात ९० लाखांच्या आसपास खर्च झाला आहे. गेल्या तीन वर्षात ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. त्यापैकी अवघा ९० लाखांचा खर्च देखभाल दुरुस्तीवर झाला आहे. भवन विभागाने या निधीचा पुरेपुर वापर करुन देखभाल दुरुस्तीवर भर दिल्यास नाट्यगृहांची  ‘शोभा’ वाढेल. बालगंधर्व रंगमंदिर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि गणेश कला मंच ही चार नाट्यगृहे सोडली तर अन्य नाट्यगृहांमधून अतिशय तोकडे उत्पन्न मिळते. त्यामुळे उर्वरीत दहा नाट्यगृहे म्हणजे पांढरे हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अधिकारी आता नवी नाट्यगृह बांधू नयेत असे मत व्यक्त करीत आहेत. ======नाट्यगृहांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च वर्ष        तरतूद                खर्च२०१७-१८    १० कोटी ३ कोटी             ३७ लाख ८५ हजार२०१८-१९    १६ कोटी ६ लाख             ३३ लाख ३७ हजार२०१९-२०    ११ कोटी ६ लाख             १७ लाख ८३ हजार एकूण        ======

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका