राजपूर आश्रमशाळेला आयएसओ
By Admin | Updated: May 11, 2017 04:17 IST2017-05-11T04:17:27+5:302017-05-11T04:17:27+5:30
आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्पातील आयएसओ मानांकन मिळविणारी पहिली शासकीय आश्रमशाळा म्हणून शासकीय आश्रमशाळा राजपूर ठरली आहे.

राजपूर आश्रमशाळेला आयएसओ
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्पातील आयएसओ मानांकन मिळविणारी पहिली शासकीय आश्रमशाळा म्हणून शासकीय आश्रमशाळा राजपूर ठरली आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असते. यामध्ये आदिवासी भागातील आश्रमशाळांनी का मागे राहावे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अत्यंत डोेंगरदऱ्या, खोऱ्यामध्ये असणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर या आश्रमशाळेने विशेष प्रयत्न करून आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्पातील एकूण पाच जिल्ह्यांतील ३१ आश्रमशाळांपैकी पहिली आयएसओ मानांकन मिळविणारी आश्रमशाळा ठरली आहे.
आदिवासी भागामध्ये असणारी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर यांनी सन २०१६-१७ या वर्षामध्ये स्वच्छ भारत विद्यालय पुरस्कार जिल्ह्यात पात्र असलेली एकमेव आश्रमशाळा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण अंतर्गत
प्रगत शाळा डिजीटल शाळा म्हणून घोषित शाळा सिद्धी शैक्षणिक कार्यक्रम अंतर्गत ‘अ’ श्रेणी प्राप्त त्याचप्रमाणे एकलव्य स्पर्धा परीक्षेत १०० टक्के निकाल यांसारखे उल्लेखनीय कार्य करत आदिवासी भागामध्ये एक नावीन्यपूर्ण ठसा उमटविला आहे.
शासकीय आश्रमशाळांची पाहणी करण्यासाठी आलेले आय.एस.ओ. मानांकन लिड आॅडिटर अनिल येवले यांनी राजपूर आश्रमशाळेतील लावलेले डिजीटल फ्लेक्स, सुंदर सुविचार, रंगरंगोटी, विविध स्पर्धा, त्याचप्रमाणे उपक्रम या सर्व निकषांवर आधारित आय.एस.ओ. मानांकनप्राप्त म्हणून पहिली आश्रमशाळा म्हणून घोषित केली.