अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 05:50 PM2021-07-08T17:50:17+5:302021-07-08T18:17:16+5:30

दुबई येथे झालेल्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत चार वर्षांच्या ईशानवीचं यश..!

Ishaanvi Adhalrao Patil's 'world record' in just four years!; Flags of 195 countries recognized in three minutes | अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज

अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज

Next

मंचर : काही लहान मुलांच्या बुद्धिमत्तेला तोड नसते. त्यांच्या अचाट व विलक्षण ज्ञानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं पुणे जिल्हयातील चार वर्षांच्या ईशानवीचे बुद्धीकौशल्य पाहून झाले नाही तर नवलच. या चिमुरडीचं जागतिक पातळीवरचं ज्ञान आणि ते जलदगतीने मांडण्याची पद्धत पुणे परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. 

आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी देशपांडे येथील ईशानवी बाळासाहेब आढळराव पाटील या चिमुरडीने सर्वात जलद गतीने जगातील सर्व देशांचे झेंडे ओळखणे आणि देशांच्या राजधान्याही पाठ करून कमीत कमी वेळात सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. दुबई येथे झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत तिने हे यश मिळवले.

मूळचे आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी देशपांडे येथील बाळासाहेब आढळराव पाटील हे व्यवसायाच्या निमित्ताने दुबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची चार वर्षे ११ महिन्यांची कन्या ईशानवी बाळासाहेब आढळराव-पाटील हिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. १५ जून रोजी तिने १९५ देशांचे झेंडे ओळखून त्यांच्या राजधान्या केवळ तीन मिनिटे दहा सेकंद इतक्या जलद गतीने सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्याद्वारे तिने जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. एक नव्हे तर तब्बल तीन विक्रमांना तिने गवसणी घातली आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीनही ठिकाणी तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

कोणतीही गोष्ट स्वयंस्फूर्तीने आत्मसात करण्यासाठी ईशानवीमध्ये असलेली जिद्द व चिकाटी कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया तिची आई नीता आढळराव व भाऊ आराध्य आढळराव यांनी व्यक्त केली आहे. जागतिक विक्रमाची नोंद केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंबेगाव तालुक्याचे नाव ईशानवीमुळे आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे.

Web Title: Ishaanvi Adhalrao Patil's 'world record' in just four years!; Flags of 195 countries recognized in three minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.