शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

By राजू हिंगे | Updated: February 25, 2024 17:54 IST

भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जातीये

पुणे: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. काही राजकीय मंडळी गुंडांना भेटून त्यांचे सत्कार करतात. तर दुसर्‍या बाजूला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची घटना घडते. त्या सर्व घडामोडी दरम्यान आता ड्रग्ज सापडत आहेत. अमली पदार्थांपासून तरुणांनी दूर राहिले पाहिजे. त्यामुळे राज्यात आज सरकार आहे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही आमदार पोलिसांबाबत काहीही विधान करत आहेत. आम्हाला कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे हे सरकार बिल्डर, ठेकेदार की सर्व सामान्य नागरिकांचे सरकार आहे अशी टिका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते , माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्येकेली आहे.  

 यावेळी माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण , माजी आमदार माेहन जोशी उपस्थित होते.   आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यातील   रुबी हॉल पासून पुढे जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम देखील पूर्ण झालेले आहे आणि विमानतळाच्या ट्रमिनअल दोनचे उदघाटन अदयाप ही होत नाही. विमानतळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाही म्हणुन पाच महिने झाले विमानतळाचे उदघाटन झाले नाही.  केवळ व्हीआयपींना वेळ नसल्याने अद्यापपर्यंत उद्घाटन झाले नाही. तसेच दुसर्‍या एका पुलाचे काम अर्धवट आहे. त्याचे उदघाटन करण्यास घटनाबाह्य मुख्यमंत्री आतुर असल्याचे दिसत आहे. आजपर्यंत अर्धवट पुलाच्या कामाचे उदघाटन कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आपण पाहिले आहे का? काल पोर्णिमा असल्याने त्यांना वेळ नव्हता. अमावस्या आणि पोर्णिमेला शेती करायला जातात. हे त्यांच्या आजवरच्या दौर्‍यांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता तरी पुलाचे उद्घाटन करून नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका करा, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली.

भाजपाला लोकशाही नको

राज्यातील छोटे छोटे पक्ष संपवा असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने लोकशाही संपवली आहेच. २०२२ मध्ये शिवसेना, २०२३ मध्ये राष्ट्रवादी फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला. तसेच आता २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भाजपाला लोकशाही नको आहे आणि तुम्ही मला ज्या व्यक्ती बाबत प्रश्न विचारला, त्यांचा चायनाशी जवळचा संबध असल्याचे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निवडणूक आयोगाच्या सूचना असतानाही आणि चार वर्षे पूर्ण झालेली असतानाही अनेक शहरांचे आयुक्त देखील बदलले नाहीत, या मागचं गौडबंगाल काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला

आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर चर्चा सुरू असून पुढील काही दिवसात त्याचा निर्णय जाहीर होईल. आम्ही जागा वाटपात मध्ये कोणीही भांडत नाही. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतली. आम्ही जागासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी लढत आहे.  भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण