बेजबाबदार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:15 IST2021-08-25T04:15:51+5:302021-08-25T04:15:51+5:30

पुणे : कात्रज येथील सुखसागरनगर येथील पुलाचे बांधकाम केले आहे. बेजबाबदार ठेकेदारामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, काही ...

Irresponsible contractor should be blacklisted | बेजबाबदार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे

बेजबाबदार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे

पुणे : कात्रज येथील सुखसागरनगर येथील पुलाचे बांधकाम केले आहे. बेजबाबदार ठेकेदारामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, काही नागरिक जखमी झाले आहे. याबाबत पोलिस तक्रार होऊनही महापालिका अधिकाऱ्याने संबंधित ठेकेदारावर कोणतीच कारवाई केली नसल्याची तक्रार काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऋषीकेश बालगुडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे़

याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंद झाली असून, त्या ठेकेदारावर ५७२/२१ भादंवि ३३७ ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीसांनीही पुणे मनपाकडे कायदेशीर कारवाईचा तपशील मागविला आहे. पण अद्यापही मनपा अधिकारी यावर कोणातीही कार्यवाही न करता कानाडोळा करत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी व संबंधित ठेकेदारास काळ्यायादीत टाकावे, अशी मागणी बालगुडे यांनी आपल्या निवेदनात केली आहे़

---------------------

Web Title: Irresponsible contractor should be blacklisted