शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूडमधील ‘एकलव्य’ तंत्रनिकेतनच्या कामकाजात अनियमितता; तंत्रशिक्षण संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:03 IST

कोथरूड येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतनच्या कामकाजात विविध प्रकारच्या त्रुटी असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. त्यानुसार पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने तंत्रशिक्षण संचालकांना याबाबचा अहवाल पाठविला आहे. 

ठळक मुद्देठाणे येथील सिटीझन फोरम इन सॅक्टिटी इन एज्युकेशनल सिस्टीम या संस्थेने केली तक्रार विभागीय कार्यालयाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाकडे कारवाईबाबत पाठविला अहवाल

पुणे : कोथरूड येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतनच्या कामकाजात विविध प्रकारच्या त्रुटी असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. त्यानुसार पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने तंत्रशिक्षण संचालकांना याबाबचा अहवाल पाठविला आहे. ठाणे येथील सिटीझन फोरम इन सॅक्टिटी इन एज्युकेशनल सिस्टीम या संस्थेने ‘एकलव्य’च्या कामकाजाबाबत पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी समिती नेमण्यात आली. संस्थेच्या कामकाजात अनियमितता असल्याचा अहवाल या समितीने विभागीय कार्यालयाकडे सुपूर्त केला आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, सेवापुस्तिका अद्ययावत न ठेवणे, शासकीय नियम व मानकानुसार संस्थेचे प्रशासकीय व शैक्षणिक कार्यपद्धती नसल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, संस्थेवर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली होती. त्यानुसार विभागीय कार्यालयाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाकडे कारवाईबाबत अहवाल पाठविला आहे.

समितीकडून दिला कारवाईचा अहवाल एकलव्य शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतनच्या कामकाजात अनियमितता असल्याचा अहवाल समितीकडून देण्यात आला आहे. सिटीझन फोरमने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत आहे. यात समितीने केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करण्याचा अहवाल आहे, असे पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डी. आर. नंदनवार यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. कारवाईबाबतचा निर्णय संचालनालयाच्या पातळीवर घेतला जाईल, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kothrudकोथरूडPuneपुणे