IPL 10 : T-20 तील नंबर वन गोलंदाज पुण्याच्या संघात

By Admin | Updated: March 23, 2017 21:49 IST2017-03-23T21:47:06+5:302017-03-23T21:49:27+5:30

इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने दहाव्या सत्रात शार्दूल ठाकूरनंतर आणखी एका गोलंदाजाला करारबद्ध केलं आहे.

IPL 10: Pune Warriors bowlers in T-20 | IPL 10 : T-20 तील नंबर वन गोलंदाज पुण्याच्या संघात

IPL 10 : T-20 तील नंबर वन गोलंदाज पुण्याच्या संघात

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 - इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजॉइंट्स या संघाने दहाव्या सत्रात शार्दूल ठाकूरनंतर आणखी एका गोलंदाजाला करारबद्ध केलं आहे. आयसीसीच्या T-20 आणि एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन असलेल्या द. आफ्रिकेच्या इम्रान ताहिरला पुणे संघाने करारबद्ध केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर पुणे संघानी बदली खेळाडू म्हणून ताहिरला आपल्या चमूत घेतलं आहे. बंगळुरत झालेल्या लिलावप्रक्रियेत ताहिरला कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. गेल्या वर्षी ताहिरने दिल्ली संघाचे नेतृत्व केलं होतं. पुणे संघाने यापुर्वी मुंबई रणजी संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला आपल्या चमूमध्ये घेतले आहे.

आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दहा वर्षांतील ही अखेरची स्पर्धा आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील.

आरपीएसचा संघ पुढीलप्रमाणे : महेंद्र सिंह धोनी, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श, रविचंद्रन अश्विन, फाफ डू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, अ‍ॅडम जंपा, इम्रान ताहिर अंकित शर्मा, अंकुश बेन्स, अशोक डिंडा, बाबा अपराजित, बेन स्टोक्स, डॅनियल क्रिस्टियन, दीपक चाहर, ईश्वर पांडे, जसकरण सिंह, जयदेव उनाडकट, लोकी फर्ग्युसन, मनोज तिवारी, मयंक अग्रवाल, मिलिंद टंडन, राहुल अजय त्रिपाठी, राहुल चाहर, रजत भाटिया, सौरभ कुमार आणि उस्मान ख्वाजा.

Web Title: IPL 10: Pune Warriors bowlers in T-20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.