शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 21:05 IST

माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्त येत्या डिसेंबर महिन्यात आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टने तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बुधवारी (दि.१०) राष्ट्रपती भवनात सदिच्छा भेट घेतली. माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्त येत्या डिसेंबर महिन्यात आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले आहे.                  प्रारंभी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माऊलींची मूर्ती, गाथा व ज्ञानेश्वरी देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, योगी निरंजननाथ, उमेश महाराज बागडे आदी उपस्थित होते.                दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वारकरी संप्रदायाचे महत्व, आषाढी पायीवारीची माहिती, माऊलींच्या समाधीची माहिती, देवस्थानच्या विविध प्रकल्पांची फोटोसह माहिती ट्रस्टच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली. सुमारे चाळीस मिनिटांच्या भेटीत राष्ट्रपती मुर्मू यांनी वारकरी संप्रदायाचा इतिहास जाणून घेतला. महाराष्ट्रातून तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने केलेला हा सन्मान म्हणजेच साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला आहे अशी भावना यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूAlandiआळंदीPresidentराष्ट्राध्यक्षsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरIndiaभारत