शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हातावरील गोंदलेल्या नावावरुन महिलेच्या खुनाचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:07 IST

लोहगाव येथील शेतात एका महिलेचा ८० टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता़. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत ए बी आणि अयोध्या असे गोंदलेले होते़. या छोट्या धाग्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तपास सुरु केला़.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी : फेसबुकवरुन पटली ओळख         महिलेकडून गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत , तू घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न कऱ नाही तर तुझ्या घरी येऊन तमाशा करेन, अशी धमकी

पुणे : लोहगाव येथील शेतात महिलेचा जवळपास ८० टक्के मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. तिच्या हातावर अयोध्या असे गोंदले असल्याचे लक्षात आले़. या एका छोट्याच्या धाग्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने फेसबुकच्या साहाय्याने या महिलेचे ओळख पटविली व खुन करणाऱ्या तिच्या प्रियकराला जेरबंद करण्यात यश मिळविले़. अयोध्या सुदाम वैद्य (वय २५, रा़ शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़. तिचा प्रियकर बालाजी ऊर्फ गुरुजी वैजनाथ धाकतोंडे (वय २७, रा़ गणपती मंदिराजवळ, मुंजाबा वस्ती, विश्रांतवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे़. याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी दिली़. लोहगाव येथील स़ ऩ १०९ पाटील वस्ती येथील शेतात ११ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास एका महिलेचा ८० टक्के जळालेल्या मृतदेह मिळाला होता़. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत ए बी आणि अयोध्या असे गोंदलेले होते़. या छोट्या धाग्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तपास सुरु केला़. तेवढी तांत्रिक माहिती व फेसबुकच्या आधारे उजव्या हातावर गोंदलेल्या अयोध्या वैद्य या महिलेचा फोटो आढळून आला़. तिची व मृतदेहाची माहिती जुळून आल्याने ही तीच महिला असावी, अशी खात्री पटली़. तिच्या जवळच्या मैत्रिणीचा शोध घेऊन पोलिसांनी तिचा पत्ता शोधून काढला़. तिला फोन आल्याने ती १० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता धानोरी रोड येथील बालाजी धाकतोंडे याला भेटायला गेली होती़. त्यानंतर ती परत न आल्याचे तिच्या घरमालकाने सांगितले़. धाकतोंडे १० मे पासून हेअर सलूनच्या दुकानात आला नव्हता़. त्याने त्याच रात्री आपल्या पत्नीला फोन करुन माझे हातून मोठे लफडे झाले आहे़, तू ताबडतोब सर्व सामान घेऊन गावी निघून जा, असे सांगितले़. त्याचा शोध घेतला असताना तो हडपसर येथील काळेपडळमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली़. पोलिसांनी सोमवारी त्याला तेथून ताब्यात घेतले़. त्याने आपला साथीदार आंड्या ऊर्फ अनिकेत सुनिल खंडागळे (रा़ सिद्धार्थनगर, लोहगाव) याच्या मदतीने अयोध्या वैद्य हिचा खुून केल्याची कबुली दिली़.  वैद्य या एका कंपनीत कामाला असून साडेतीन वर्षांपासून पुण्यात आहेत़. यापूर्वी त्यांचे दोन लग्ने झाली असून त्यांनी दोघांनाही सोडले आहे़. हेअर सलूनमध्ये गेल्याने त्यांची बालाजी धाकतोडे याच्याशी ओळख झाली होती़. त्यांचे गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत , तू घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न कऱ नाही तर तुझ्या घरी येऊन तमाशा करेन, अशी धमकी ती वारंवार बालाजीला देत असत़. त्यामुळे तिचा काटा काढण्यासाठी त्याने अनिकेतच्या मदतीने कट रचला़. पेट्रोल विकत घेऊन तिला बोलावून घेतले़. ते तिघे जण लोहगाव येथे आडबाजूला गेले़. तेथे तिला दारू पाजली़. त्यांचे तेथे पुन्हा भांडण झाले़. तेव्हा त्याने चाकूने तिला भोसकून तिचा खुन केला़. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळून टाकला़.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त भानूप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक फौजदार लक्ष्मण शिंदे तसेच पोलीस कर्मचारी संतोष मोहिते, प्रदीप सुर्वे, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, माणिक पवार, केरबा गलांडे, सिद्धराम कोळी, महेश वाघमारे, गणेश बाजारे, प्रविण काळभोर, अमजद पठाण, अंकुश जोगदंडे, प्रमोद घाडगे, सुनंदा भालेराव स्नेहल जाधव यांनी केली आहे़. ....अयोध्या हिचा मृतदेह जवळपास ८० टक्के जळालेला होता़. त्यावरुन ओळख पटत नव्हती़.त्याचवेळी तिचा उजवा हात अर्धवट जळालेला होता़. पोलिसांनी तो धुतल्यावर त्यावर गोंदविलेले अयोध्या हे अक्षर दिसू लागले़. या एका धाग्यावरुन पोलीस तिच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचले़. 

टॅग्स :PuneपुणेLohgaonलोहगावCrimeगुन्हाPoliceपोलिस