शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

कार्ला कळसचोरीचा तपास चुकीच्या दिशेने : अनंत तरे; सनदशीर मार्गाने आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 6:28 PM

लोणावळा कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या कळसाचा तपास जाणूनबुजून तपास अधिकारी चुकीच्या पद्धतीने करत आहेत, असा आरोप अनंत तरे यांनी केला आहे.

ठळक मुद्देकळस चोरीचा तपास सीआयडीकडे सोपवावा : अनंत तरेसनदशीर मार्गाने रस्ता रोको, मोर्चा, धरणे आंदोलन करण्याचा इशारा

पुणे : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या लोणावळा कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या कळसाचा तपास जाणूनबुजून तपास अधिकारी चुकीच्या पद्धतीने करत आहे आणि वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज मिळून अद्यापही पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नाही, असा आरोप करत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एपीआय साधना पाटील यांना तातडीने निलंबित करून चौकशी करून बडतर्फ करावे, अशी मागणी एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी मदन भोेई, नवनाथ देशमुख, विलास कुटे आदी उपस्थित होते.या मंदिराचा कळस ३ आॅक्टोबर रोजी चोरीला गेला होता. या प्रकरणाचा तपास एपीआय साधना पाटील यांच्याकडे होता. कळस चोरीबाबत अशोक पडवळ या व्यक्तीने आवाज उठवला असता तथाकथीत गावातल्यांनी त्याला बेदम मारहाण केली, अशोक पडवळ ह्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली पण साधना पाटील यांनी एफआयआरसुद्धा दाखल केला नाही. मावळ तहसिलदार आणि एपीआय साधना पाटील यांच्यासमोर दहशद आणि दादागिरीने आमचे राजीनामे घेतले आहेत. आम्हाला जबरदस्ती करून कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या असून विश्वस्त विलास कुटे, संजय गोविलकर, विजय देशमुख यांनी सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा एफ आर आय नोंदवला नाही. ट्रस्टचे सहखजिनदार विलास कुटे यांना पिस्तूल लावून पळवून नेऊन कोंडून ठेवले, व कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या, याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार केली, पण साधना पाटील यांनी काहीही कारवाई आजपर्यंत केली नाही, असे तरे म्हणाले.कळस चोरांना तातडीने पकडावे. २० वर्षांपासून अधिकृत असलेल्या एकवीरा देवस्थान ट्रस्टचे बॅनर, बोर्ड ज्या ठिकाणी लावले होते ते वनखाते, पुरातत्व खाते यांना दमबाजी करून काढायला लावावे, दहशत आणि अनधिकृत कामाला प्रोत्साहन देणाऱ्यांना पाठीशी घालून कायदा सुव्यवस्था बिघडेल, असे वर्तन करून देवस्थान ट्रस्टच्या विरोधात काही गावगुंडांना भडकविणाऱ्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मुख्य एपीआय साधना पाटील यांचे तातडीने निलंबित करून चौकशी करून बडतर्फ करावे. कळस चोरीचा तपास सीआयडीकडे सोपवावा, वेहेरगावातील काही नेते गावगुंडांना हाताशी धरून हाणामारी, दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना तातडीने अटक करून कारवाई व्हावी अन्यथा एकवीरा देवस्थान ट्रस्ट व देवीचे भक्त असलेले संतोष केणे, वेदा म्हात्रे, डी. एम. कोळी, जयेंद्र खुणे, जितेंद्र पाटील, अरविंद भोईर आदी कोळी-आगरी भक्तगण लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन विरोधात सनदशीर मार्गाने रस्ता रोको, मोर्चा, धरणे आंदोलन करतील, असा इशारा एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे