ठळक मुद्देरस्त्याची समस्या कायम, पावसाळ्यात कार्ला फाट्यापासून पाण्यातून शोधावा लागतो रस्ताग्रामस्थ, ग्रामपंचायत, देवस्थान यांच्यामध्ये नाही सुसंवाद, तू तू-मैं मैं’पणामुळे विकासाला खीळ

कार्ला : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकवीरा देवस्थानाचा विकास येथील ‘तू तू-मैं मैं’च्या वादात रखडला आहे. 
येथील रस्त्याची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. रस्त्यात खड्डे का खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था आहे. पावसाळ्यात कार्ला फाट्यापासून भाविक, पर्यटकांना पाण्यातून रस्ता शोधावा लागतो. पथदिव्यांचीही व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी अंधारात रस्ता शोधताना गोंधळ उडतो. पाण्याची मुबलक व्यवस्था नाही, आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पोलीस मदत चौकी यात्रेपुरतीच सुरू असते. गडावर वाहनतळ एकच आहे. ते फुल्ल झाले, की वाहने रस्त्यावरच लावली जातात. यामुळे वाहतूककोंडी होते. मोक्याच्या ठिकाणी भक्तनिवास नाही. रोपवेचा कित्येक दिवसांचा प्रश्न प्रलंबित आहे. पुरातन लेणीही मंदिराच्या जवळच आहे. पायर्‍या निखळल्या आहेत. याकडे पुरातत्त्व खातेही लक्ष देत नाही. 
ग्रामस्थ, ग्रामपंचायत, देवस्थान यांच्यामध्ये सुसंवाद नाही. आपापसातील ‘तू तू-मैं मैं’पणामुळे विकासाला खीळ बसली आहे. नियोजनबद्ध विकासाची भूमिका घेतल्यास देवस्थान, येथील चार गावांचा विकास होऊ शकतो.