शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवा, जनहित याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 02:24 IST

जनहित याचिकेद्वारे मागणी : सोमवारी होणार युक्तिवाद

पुणे : एल्गार परिषदेच्या आणि कोरेगाव भीमा घटनेबाबत अटक आरोपीकडे यूएपीए कायद्यांतर्गत तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नाही. त्यामुळे गुन्ह्याचा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला (एनआयए) सोपविण्यात यावा, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालात करण्यात आली आहे.

सतीश सुग्रीव गायकवाड (वय ३५, दापोडी) यांच्या वतीने अ‍ॅड. तौसीफ शेख आणि अ‍ॅड. कुमार कलेल यांनी ही जनहीत याचिका दाखल केली आहे. ३१ डिसेंबर रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चिथावणीखोर भाषणे करण्यात आल्याचा आरोप करून तुषार दामगुडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर एप्रिल महिन्यात सुरेद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांवर यूएपीएअंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार एनआयएला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य आणि दबावरहित होण्यासाठी एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गुन्हा एनआयएकडे तपासासाठी द्या, सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी शिवाजी पवार यांच्यावर कारवाई करून या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत त्यांना निलंबित करा. या अर्जावरील निर्णय होईपर्यंत पुणे पोलिसांच्या तपासाला स्थगिती द्यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारेकरण्यात आली आहे. यावरील युक्तिवाद सोमवारी (दि. ३ सप्टेंबर) रोजी होणार आहे.पाचही जणांना नजरकैैदमंगळवारी वरवरा राव, अरुण फरेरा आणि वर्नोन गोन्सालविस यांना अटक केली होती. तर, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा यांना अटक करण्याची तयार करण्यात आली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकेला स्थगिती दिली होती. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाने या पाचही जणांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय