एफटीआयआयला ‘महाभारत’ आणि ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ पुस्तकांची अमूल्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:16 IST2021-09-10T04:16:14+5:302021-09-10T04:16:14+5:30
पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये ऐतिहासिक संदर्भांवर आधारित दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तकांचा अमूल्य ठेवा जतन केला आहे. ...

एफटीआयआयला ‘महाभारत’ आणि ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ पुस्तकांची अमूल्य भेट
पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये ऐतिहासिक संदर्भांवर आधारित दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तकांचा अमूल्य ठेवा जतन केला आहे. संस्थेने संपादित केलेली ‘महाभारत’ची चिकित्सक आवृत्ती ही जगभरामध्ये प्रमाणित मानली जाते. संस्थेच्या वतीने महाभारताचे 19 खंड, महाभारताची सांस्कृतिक सूची (4 खंड) यांस धर्मशास्त्राचा इतिहास’ ग्रंथाचे 5 खंड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या गजानन जहागिरदार ग्रंथालयाला देण्यात आले. संस्थेतर्फे हा दुर्मिळ ठेवा एफटीआयआयच्या ग्रंथपाल अनुराधा वाजिरे यांनी स्वीकारला.
भांडारकरच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, कुलसचिव आणि व्याख्याता श्रीनंद बापट, महाभारताच्या सांस्कृतिक सूचीचे संपादक गणेश थिटे, एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, कुलसचिव सईद रब्बीहाश्मी, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम, कला दिग्दर्शन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आशुतोष कविश्वर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
--------------------------------