मुलाखत प्रक्रियाच केली रद्द
By Admin | Updated: November 12, 2014 00:02 IST2014-11-12T00:02:24+5:302014-11-12T00:02:24+5:30
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या विद्यापीठ फंडातील पद भरतीसाठी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणा:या विद्यापीठातीलच एका माजी प्राध्यापकाने अर्ज केला होता.
मुलाखत प्रक्रियाच केली रद्द
पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या विद्यापीठ फंडातील पद भरतीसाठी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणा:या विद्यापीठातीलच एका माजी प्राध्यापकाने अर्ज केला होता. परंतु, या निवडप्रक्रियेमुळे निर्माण होणारी वादग्रस्त परिस्थिती टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने मुलाखत प्रक्रियाच रद्द केली.
मात्र, संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न केल्यामुळेच विद्यापीठावर ही वेळ आली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे.
विद्यापीठातील विद्यार्थिनींना मोबाईलवरून अश्लील एसएमएस पाठवून त्यांच्याशी असभ्य वर्तन करणा:या एका प्राध्यापकाच्या विरोधात विद्यापीठातील एका विभागाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वर्षभरापूर्वी आंदोनल केले होते. तसेच, संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली.
समितीचा अहवाल विद्यापीठाला प्राप्त होण्यापूर्वीच संबंधित प्राध्यापकाने पदाचा राजीनामा दिला. परंतु, समितीने या प्रकरणावरील आपला अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला. मात्र, प्राध्यापकाने राजीनामा दिलेला असल्यामुळे त्याच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रश्नच येत, अशी चर्चा करून हा अहवाल व्यवस्थापन परिषदेने बाजूला ठेवला. आता मात्र हाच प्राध्यापक विद्यापीठ प्रशासनाला त्रस देत असल्याची माहिती समोर येत आहे. (प्रतिनिधी)
..तर प्रश्न मिटला असता!
काही संघटनांच्या दबावाला बळी न पडता विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्राध्यापकावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली असती, तर त्या प्राध्यापकाला विद्यापीठाच्याच काय इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत नोकरी मिळाली नसती. त्यात विद्यार्थिनींशी असभ्यपणो वागणा:या प्राध्यापकाला विद्यापीठ फंडातील भरती प्रक्रियेत मुलाखतीसाठी का बोलवले गेले? विद्यापीठ प्रशासन डोळे झाकून काम करते आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, कोणत्याही पदासाठी अर्ज करणा:या प्रत्येक पात्र उमेदवाराला संबंधित संस्थेकडून मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्याचप्रमाणो या वादग्रस्त प्राध्यापकाला विद्यापीठाला बोलवावे लागले. या प्रकरणामुळे वाद होणार असल्याचा संशय आल्यामुळे विद्यापीठाने मुलाखत प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रंनी सांगितले.