शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत : विनाकारण घराबाहेर पडल्यास गय नाहीच : सुधीर हिरेमठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 07:00 IST

पोलीस कारवाई टाळण्यासाठी घरातच थांबा

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याशी साधलेला संवाद... 

नारायण बडगुजर पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहेत. लॉकडाऊनची अंमलबजाणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून गुन्हे दाखल होत आहेत. असे असले तरी पोलिसांच्याही सुरक्षेचा प्रश्न आहेच. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याशी साधलेला संवाद... 

लॉकडाऊनसाठी पोलिसांकडून काय उपाययोजना केली आहे? पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नाकाबंदी करून चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकासोबत पोलिसांचेही पथक नियुक्त केले आहे. आयुक्तालयाकडे सध्या राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आहेत. आणखी एक तुकडी मिळाली आहे. काही रेल्वे पोलीस व २०० होमगार्ड बंदोबस्तासाठी उपलब्ध झाले आहेत.   

कोरोनाचे जास्त रुग्ण आढळलेल्या परिसरासाठी काय धोरण आहे?  असा परिसर सील करण्यात येतो. तेथील नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येते. सकाळी १० ते साडेबारा दरम्यान कुटुंबातील एकाच व्यक्तीला जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची सवलत देण्यात येते. इतर कोणालाही या भागात प्रवेश नसतो.       पोलीस स्वत: व कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी काय खबरदारी घेतात?  कोरोनाचे रुग्ण जास्त असलेले भाग सील करण्यात आले आहेत. असा परिसर हॉटस्पॉट असतो. मात्र शहरात बंदोबस्तावर असलेल्या प्रत्येक पोलिसाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. ड्युटी संपल्यानंतर घरी गेल्यावर स्वच्छतेची काळजी घेतली जाते. कुटुंबात न मिसळता वेगळ्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली आहे. घरातही सोशल डिस्टन्स पाळले जाते. सॅनिटायझरचा वापर व निजंर्तुकीकरण केले जाते.

पोलिसांच्या कुटुंबियांना काय मदत होत आहे? पोलिसांच्या कुटुंबियांना किराणा व भाजीपाला घरपोहच देण्यात येत आहे. सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोव्हज यासह किराणा व धान्याचे किट तयार केले आहे. ते देखील या कुटुंबियांना वाटप करणार आहे.  

बंदोबस्तावरील पोलिसांचे काय?बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी कक्ष उभारले असून, खूर्ची, जेवण, पाणी आदी पोलिसांना पुरवले आहे. तसेच पीपीई किट, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज आदी सुरक्षा साधने त्यांना  दिली आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी पुर्णपणे खबरदारी घेण्यात येत आहे.  

.......................

काही पोलिसांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. आवश्यकतेनुसार पोलिसांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना दिल्या जातात. नागरिकांनी घरातच थांबावे कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. शहरातील हॉटस्पॉटवर शासनाच्या निदेर्शानुसार उपाययोजना होत आहेत. अशा ठिकाणी कारवाई अधिक प्रभावी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. कारवाई केलीच जाईल, ही कारवाई व कोरोना टाळायचा असेल तर नागरिकांनी घरातच थांबावे.- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस