शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या जागेसाठी भाजपकडून ८ जणांच्या मुलाखती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 17:30 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात महायुतीमधील कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठळक मुद्देशिवसेना, रासपनेही केला बारामतीच्या जागेवर दावा

बारामती: बारामती विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने आठ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ सहराततज्ज्ञ चंद्रराव तावरे हे देखील मुलाखतीला हजर होते. मात्र, कालपर्यंत इच्छुकांच्या यादीमध्ये नाव असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे मुलाखतीला गैरहजर राहिले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात महायुतीमधील कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपसह बारामतीच्या जागेवर शिवसेना व राष्ट्रीय समाज पक्षाने देखील दावा केला आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील दादा जाधवराव सभागृहात बारामती, दौंड, इंदापूर, भोर, पुरंदर आदी तालुक्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी बारामती विधानसभेच्या जागेसाठी चंद्रराव तावरे, रंजनकुमार तावरे, ज्ञानेश्वर कौले, राहूल तावरे, कुलभूषण कोकरे, गोविंद देवकाते, अभिजित देवकाते, सुरेंद्र जेवरे आदी मुलाखतीसाठी हजर होते. तर इच्छुकांमध्ये नावे असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्यासह नविन चेहºयांमध्ये प्रबळ दावेदार मानले जाणारे  अविनाश मोटे, प्रशांत सातव गैरहजर राहिल्यानेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र युतीमध्ये बारामती विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. मागील विधानसभा निवडणुका युती, आघाडी विरहित पार पडल्या होत्या. सध्या वरिष्ठ पातळीवरून युती करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच सध्याच्या युतीच्या ठरलेल्या फॉम्युल्याप्रमाणे विजयी जागा सोडून जो पक्ष ज्या ठिकाणी क्रमांक दोनवर असेल ती जागा सबंधित पक्षाला सोडली जाणार आहे.  

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार बाळासाहेब गावडे यांनी ६० हजाराच्या आसपास मतदान घेतले होते. त्यामुळे बारामती जागा भाजपला मिळावी.  अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. नितिन भामे यांनी सांगितले. तर एकीकडे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी देखील आपला परंपरागत मतदार संघ न सोडण्याचा चंग बांधला आहे. त्याचप्रमाणे महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आपली या मतदार संघात अधिक ताकद असल्याचा दावा करीत बारामतीची जागा रासपलाच मिळावी, अशी मागणी केली आहे.  

दरम्यान सासवडे येथे पार पडेलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये पुरंदर तालुक्यातून सर्वाधीक म्हणजे १८ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. त्याखालोखाल इंदापूर - १३, भोर- १३, दौंड-५ आदींनी मुलाखती दिल्या आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक