शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

योग विषयाचे बाजारीकरण : स्वामी भारत भूषण; पुण्यात आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 12:18 IST

इन्स्टिट्यूट आॅफ योगा, लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एजुकेशनल ट्रस्ट, रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट, मल्टिव्हर्सिटी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चौथा पुणे जागतिक योग महोत्सव पौडजवळील कोलवण येथे नुकताच झाला.

ठळक मुद्देयोग विषयाचा प्रसार होणे गरजेचे : स्वामी भारत भूषण ३०० उपस्थितांनी केले सामूहिक अग्निहोत्र, जाणून घेतली सर्वांगीण माहिती

पुणे :  योग विषयाचा प्रसार होणे गरजेचे असून त्याचे बाजारीकरण होत असल्याची खंत स्वामी भारत भूषण यांनी व्यक्त केली. इन्स्टिट्यूट आॅफ योगा, लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एजुकेशनल ट्रस्ट, रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट, मल्टिव्हर्सिटी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि योग संस्था (सांताक्रूझ), महर्षी विनोद प्रतिष्ठान (पुणे), महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान (पुणे) यांच्या संयुक्त सहकार्याने चौथा पुणे जागतिक योग महोत्सव पौडजवळील कोलवण येथे नुकताच झाला. या वेळी भारत भूषण बोलत होते.

महोत्सवात प.पू. स्वामी गोविंददेव गिरी (भक्तियोग), प.पू. स्वामी भारत भूषण (षट्चक्र साधना ), प.पू. स्वामी आत्मा नम्बी (त्रिवेणी ध्यान), साध्वी आभा सरस्वती (मंत्रयोग आणि मंत्रोच्चार प्रशिक्षण), डॉ. विजय भटकर (व्यवस्थापन आणि योग),  हंसाजी जयदेव योगेंद्र (योगशिक्षकाचे गुण), डॉ. संप्रसाद विनोद (शवासनामधील बारकावे) आदींनी मार्गदर्शन केले. योगगुरू म्हणवून घेण्यापेक्षा आपण योगसाधक म्हणून आयुष्यभर काम करावे, असे हंसाजी जयदेव यांनी स्पष्ट केले. भगवद्गीतेवर स्वामी गोविंददेव गिरी यांनी मार्गदर्शन केले. आत्मा नम्बी स्वामी यांनी त्रिवेणी ध्यानाची अनुभूती उपस्थित साधकांना दिली. डॉ. मुकुंद भोळे यांचे प्राणायाम लोकांना अभ्यासाचा विषय ठरला. शवासनामधील बारकावे आणि वेशिष्ट्ये डॉ. संप्रसाद विनोद यांनी विशद केली. या प्रसंगी डॉ. राजीमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० उपस्थितांनी सामूहिक अग्निहोत्र केले आणि त्याची सर्वांगीण माहिती जाणून घेतली. निसर्गोपचारांमधील मातीलेपनाचे प्रात्यक्षिक आणि त्याचा विविध त्वाचारोगांवरील उपयोग डॉ. कुमुद जोशी यांनी विशद केला. डॉ. कुमुद जोशी यांना त्यांच्या योग - निसर्गोपचार ५० वर्षांच्या सेवेसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अनिल जयवंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विदुला शेंडे यांनी प्रास्ताविक  केले.

नैराश्य, नकारात्मक जीवनतरुणांमध्ये नैराश्य भावना खूप वाढताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण जग हे एका नकारात्मक जीवन पद्धतीकडे ढकलले जात आहे. या सर्व गोष्टींमधून आपण सर्व जण बाहेर पडण्याचा मार्ग कायम शोधत असतो आणि ती संधी आपल्याला या योग महोत्सवामध्ये चालून आलेली आहे, असे संयोजक डॉ. विश्वास शेंडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :YogaयोगPuneपुणे