शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Baramati: खेळाडूंसाठी आनंदाची बातमी! बारामतीत घडणार अंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 16:18 IST

क्रिडा संकुलात मुलांच्या वसतीगृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे खेळाडूंच्या निवासाची चांगली सोय होणार आहे...

बारामतीबारामती शहरात पुणे जिल्हा क्रिडा संकुलाचे नुतनीकरण करण्यात येत असून त्यामुळे संकुलाचे रुपडे पालटणार आहे. बारामती नगरी आता 'क्रिडा हब' म्हणून उदयास येत आहे. खेळाडूंसाठी ही आनंदाची बाब असून क्रीडा संकुलाच्या माध्यमातून  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यासाठी  मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रिडा विभागाच्या वतीने देण्यात आली. क्रिडा संकुलात मुलांच्या वसतीगृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे खेळाडूंच्या निवासाची चांगली सोय होणार आहे. कबड्डी, बॅडमिंटन, लॉन टेनिस, जिम, हॉलीबॉल, कराटे, बॉक्सींग, टेबल टेनिस, स्पोर्टस झुम, फिटनेस योग, ओपन जिम इत्यादी सुविधा यात अंर्तभूत आहेत, अशी माहिती तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे  यांनी दिली.  

क्रीडा संकुलाच्या नूतनीकरनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे राजेश बागुल व क्रिडा मार्गदर्शक अविनाश लगड यांचे मोलाचे सहकार्य व  मार्गदर्शन मिळत आहे असेही ते म्हणाले. जिल्हा क्रिडा संकुल पुणे अंतर्गत एम.आय.डी.सी. कटफळ येथे ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, ५ हजार क्षमता असलेली  प्रेक्षक गॅलरी, हॉकी मैदान, चेंजिंग रुम, क्रिडा साहित्य रुम, स्केटिंग रिंग, शुटिंग रेंज, जलतरण तलाव, फिल्ट्रेशन  प्लांन्ट, विविध खेळांची मैदाने, मुलामुलींचे वसतिगृह, वेटलिफ्टिंग हॉल, एक्सरसाईज हॉल, कराटे, बॉक्सिंग, फुल आर्चरी रेंज, सायकलिंग ट्रॅक, बहुउद्देशीय हॉल, व कॉन्फरन्स रुम इत्यादी कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होण्याच्या मागार्वार आहेत.

संकुलाच्या शेजारील मार्केट यार्ड येथील ३ एकर जागेत बॉक्सिंग हॉल, कुस्ती हॉल, टेबल टेनिस, मिनी स्केटिंग रिंग कराटे, कबड्डी हॉल, खो-खो मैदान, जिम, १० मिटर शुटींग रेंज,  मिनी आर्चरी मैदान व बॉस्केटबॉल मैदान इत्यादी कामेही  प्रगतीपथावर आहेत.  तालुका क्रिडा संकुल माळेगाव येथे 11 एकर  जागेवर ४०० मिटर धावन मार्ग, बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल, कराटे, क्रिकेट, पोलीस प्रशिक्षण, जिम, लॉन टेनिस कोर्ट, व्हॉलिबॉल, कबड्डी  आणि खो खो मैदान तयार करण्यात आले आहेत. क्रिडा संकुलातील सुविधांचा बारामती परिसरातील युवा खेळाडूंना विशेष उपयोग होणार आहे. त्यांच्यासाठी या सुविधा म्हणजे एकप्रकारे प्रोत्साहन ठरले आहे. एकूणच जिल्ह्यातील  खेळाडूंनाही या सुविधांचा लाभ घेता येईल आणि त्यातून उद्याचे यशस्वी खेळाडू घडतील यात शंका नाही.बारामती परिसरातील खेळाडूंना मिळणारनिष्णात प्रशिक्षकाचे मार्गदर्शन...खेळाडूंना सुविधेसोबत चांगले प्रशिक्षणही देण्यात येते. तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांना २००२ मध्ये ४४ देशांच्या आशियाई खेळामध्ये अ‍ॅथलॅटिक्स या खेळ प्रकारात पदक मिळाले आहे. त्यांनी तिन्ही सेनादलामध्ये अ‍ॅथलॅटिक्स या खेळाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.  क्रिडा संकुलात येणाºया खेळाडूंना त्यांच्यासारख्या निष्णात प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळणे ही जमेची बाजू आहे. क्रिडा संकुलामध्ये तालुका क्रिडा अधिकारी,  क्रिडा मार्गदर्शक यांच्या माध्यमातून युवा खेडाळूंना खेळाचे महत्व पटवून देण्यात येते.  युवा खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी  विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध शासकीय योजना यशस्विपणे राबविण्यात येत आहेत.  विविध क्रिडा स्पधेर्चे आयोजन या ठिकाणी होत असल्याने क्रिडा संकृती रुजविण्यासाठी त्याची मदत झाली आहे. बारामती शहरातील तसेच ग्रामीण भागतील खेळाडूंचा स्पर्धामधील सहभाग वाढतो आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामती