आंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो सिटी

By Admin | Updated: February 15, 2017 02:14 IST2017-02-15T02:14:09+5:302017-02-15T02:14:09+5:30

शहराला सुखी, शांत व समृद्ध बनवून राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय मेट्रो सिटी बनवणार आहे. राष्ट्रवादीची

International City Metro City | आंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो सिटी

आंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो सिटी

पिंपरी : शहराला सुखी, शांत व समृद्ध बनवून राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय मेट्रो सिटी बनवणार आहे. राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडमध्ये बहुमताने सत्ता येणे गरजेचे असून, प्रत्येक कार्यकर्त्याने त्यासाठी एकजुटीने व एकदिलाने काम करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे व्यक्त केले.
पुण्यातील मोदीबाग या पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी-चिंचवडसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्या वेळी पवार बोलत होते. या वेळी माजी आमदार विलास लांडे व अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, तसेच योगेश बहल, हनुमंत गावडे, निवृत्ती शिंदे, फजल शेख, विजय लोखंडे, जगदीश शेट्टी, अरुण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे केले व आम्ही हे करणार असे दोन टप्पे दाखवले आहेत. जी विकासकामे झाली, ती दाखवली आहेत. तसेच सत्तेवर आल्यानंतर कोणती विकासकामे करणार असेही सांगितले आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचा जाहीरनामा
ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड शहर हॉर्नमुक्त करणार
देहू व आळंदी ही देवस्थाने पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट करणारजगत्गुरू संत तुकाराम संतपीठ उभारणार
कचरा संकलनाचे १०० टक्के उद्दिष्ट ठेवून पिंपरी-चिंचवड कचराकुंडीमुक्त शहर करणार
हिंजवडी, माण, मारुंजी, गहुंजे, जांबे, नेरे आणि सांगवडे ही सात गावे पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
सर्व झोपडपट्यांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा पुरवणार
सर्व शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा देणार
आंद्रा धरण, भामा-आसखेडमधून पाणी आणणार
घनकचरा व्यवस्थापनासाठी पुनावळेतील शासकीय जमीन ताब्यात घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
शहरातील सर्व मोठे चौक सिग्नलविरहित करणार
येत्या पाच वर्षांत तळवडे येथे गायरान जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान व प्राणिसंग्रहालय साकारणार
मुळा नदीवर नवीन पूल बांधून बोपखेलपासून खडकीकडे जाणारा रस्ता विकसित करणार, तसेच बोपखेलवासीयांसाठी ५० कोटी रुपये खर्चाचा पूल उभारणार
भोसरीपासून चाकणपर्यंत बीआरटीएस सुरू करणार, तर हिंजवडीमध्ये बीआरटीएस टर्मिनल उभारणार
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच वर्षांत घरे बांधणार
बचत गटांसाठी आॅनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देणार
सिंगापूरच्या धर्तीवर भव्य अ‍ॅक्वेरिअम व उद्योगनगरीचा प्रवास सांगणारे इंडस्ट्रियल म्युझिअम उभारणार.

Web Title: International City Metro City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.