बारामतीत आंतरराष्ट्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:51+5:302021-06-16T04:13:51+5:30
खेळाडूंना होणार फायदा बारामती : बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या सुविधा उभारणीचे ...

बारामतीत आंतरराष्ट्रीय
खेळाडूंना होणार फायदा
बारामती : बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या सुविधा उभारणीचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्ट देखील उभारण्यात आले आहेत.
बारामती येथे पुणे जिल्ह्यातील जिल्हा स्थरावरील क्रीडा संकूल उभे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार क्रीडा संकुलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्टचे शनिवारी (दि. १२) उद्घाटन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे यांच्या हस्ते पार पडले.
खेळाडूंनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे पावडे यांनी यावेळी म्हटले. हे क्रीडा संकुल खेळाडूसाठी उत्तम दर्जाचे क्रीडा हब होत आहे, ही एक चांगली जमेची बाजू आहे. या टेनिस कोर्टचे काम तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी अथक परिश्रमाने उच्च दर्जाचे काम वेळेत पूर्ण केले. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील आणि बारामती बँकेचे चेअरमन अविनाश लगड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी बारामती बँकेचे चेअरमन अविनाश लगड, लटपटे, महावितरणचे देवकाते,बारामती लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव दत्ता बोराडे, क्रीडा संकूलचे कर्मचारी उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : बारामती येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचे उद्घाटन करताना महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे.
१४०६२०२१-बारामती-०१
-----------------------------