पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ

By Admin | Updated: September 12, 2015 04:13 IST2015-09-12T04:13:38+5:302015-09-12T04:13:38+5:30

लोहगाव विमानतळाचा विस्तार हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून, स्मार्ट ‘पुणे’ जिल्ह्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

International airport in Pune | पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ

पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ

पुणे : लोहगाव विमानतळाचा विस्तार हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून, स्मार्ट ‘पुणे’ जिल्ह्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा निश्चित करून सर्व तांत्रिक मान्यता घेऊन लवकरात लवकर प्रस्ताव सादर करा, अशा सूचना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, दिल्लीत झालेल्या बैठकीत लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या विषयावर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत पुण्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानाची उड्डाणे वाढली आहेत. येथे धावपट्टीत वाढ करून विमान बोर्इंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विमानतळ प्रशासनाने विनंती केली आहे. सध्या बोर्इंगसाठी इंडियन एअर फोर्सच्या ताब्यात असलेली दहापैकी चार एकर जागा त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु धावपट्टी विस्तारासाठी काही खासगी जागा देखील घ्यावी लागणार आहे. एअर फोर्सच्या सरावाच्या वेळापत्रकाला धक्का न लावता विमानाचे लँडिंग वाढविण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळाचा तात्पुत्या स्वरूपासाठी विस्तार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात फॉक्सकॉनसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर व शासनाने पुणे शहराला दिलेल्या स्मार्ट सिटीचा दर्जा यामुळे जिल्ह्यासाठी आता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय महत्त्वाचा झाला आहे. यामुळेच गडकरी यांनी चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागा निश्चित करून व त्यासाठी आवश्यक तांत्रिक मान्यता घेऊन अंतिम अहवाल त्वरित शासनाला सादर करण्यास सांगितले आहे.

Web Title: International airport in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.