गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:11 IST2021-08-01T04:11:20+5:302021-08-01T04:11:20+5:30

पुणे : गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी याबाबतचा आदेश काढला ...

Internal transfers of 6 police inspectors in the crime branch | गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : गुन्हे शाखेतील ६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

पुण्यात नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. युनिट ३ चे अनिल शेवाळे यांच्याकडे दरोडा व वाहन चोरी पथक १चा कार्यभार देण्यात आला आहे.

तेथील शिल्पा चव्हाण यांची तांत्रिक विश्लेषण विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा शाखेचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.

जयंत राजुरकर यांची आर्थिक गुन्हे शाखेतून युनिट ४ला नेमणूक केली गेली आहे. रजनीश निर्मल यांची युनिट ४ वरुन प्रशासन विभागात नेमणूक केली आहे. राजेंद्र कदम यांच्याकडे भरोसा सेलबरोबर तपास व अभियोग सहाय कक्षाची अतिरिक्त जबाबदारी साेपविण्यात आली आहे.

Web Title: Internal transfers of 6 police inspectors in the crime branch