शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

इच्छुकांनी कसली कंबर

By admin | Updated: January 11, 2017 03:06 IST

सांगवी व पिंपळे गुरव परिसरात प्रचाराची चढाओढ आणि स्पर्धात्मक राजकारण बघायला मिळत असून, अनेक दिग्गज आणि मुरलेले राजकारणी कंबर कसून प्रचारास लागले आहेत.

सांगवी : सांगवी व पिंपळे गुरव परिसरात प्रचाराची चढाओढ आणि स्पर्धात्मक राजकारण बघायला मिळत असून, अनेक दिग्गज आणि मुरलेले राजकारणी कंबर कसून प्रचारास लागले आहेत. वार्डची विभागणी आणि अनेक नवे चेहरे पुढे आल्याने सांगवी परिसरात संशयकल्लोळ झाला आहे. या द्विधा परिस्थितीने जनतेचे डोके चक्रावून गेले आहे. परिसरातील मुख्य वार्ड ३१ मधून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत दिसून येत आहे. जुन्या सांगवीतील प्रत्येक उमेदवार विकासकामांचे श्रेय आपलेच असे म्हणून जागोजागी फ्लेक्स लावून जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नवीन उमेदवार राजकारणाची चव घेण्यासाठी स्पर्धेत उतरले असून, घरोघरी जाऊन मतदारांना भेटी देण्यापासून लग्न, वाढदिवसापर्यंत जनतेची काळजी घेताना उमेदवार दिसत आहेत. रस्त्याने जाताना ढुंकूनही न पाहणारे नेते आस्थेवाईकपणे जनतेची विचारपूस करताना दिसत आहेत. कामाचा वेग वाढवून जनतेच्या मुख्य गरजा लक्षात घेऊन विद्यमान नेते अनेक विकासकामे करताना दिसत आहेत. त्यामुळे नवीन रस्ते, चौकांचे सुशोभीकरण, पथदिवे सगळे काही अचानक बदलले असून, परिसराला चांगले दिवस आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या राजकारणात सांगवीची निर्णायक भूमिका असते. पूर्वी होणाऱ्या मारामाऱ्या, गॅँगवॉर आणि चढाओढ यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत मात्र पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे. काही भागात भावकी-गावकीचा नारा दिला जात आहे. काही भागात दादागिरी, पैसा यानेही डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. निवडणूक तोंडावर आल्याने फोडाफोडीच्या राजकारणालाही जोर आला आहे. पक्षात वागणूक चांगली मिळत नाही असा अचानक साक्षात्कार झाल्यासारखे अनेकजण पक्ष सोडत आहेत. नेत्यांच्या फोडाफोडीला सध्या उधाण आले आहे. त्यामुळे मात्र, मतदारांचा गोंधळ उडत आहे. या सर्व घडामोडीत मात्र, पक्षाचा कार्यकर्ता भरडून निघत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रचाराच्या हायटेक यंत्रणा, मजुरीवरील कार्यकर्ते, फोडाफोडीचे राजकारण यांमुळे यंदाची महापालिका निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. जनताही या उमेदवारांची केविलवाणी धडपड पाहून मत कोणाच्या पारड्यात टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)जाधववाडीत नागरिकांवर छाप पाडण्याकरिता फंडे जाधववाडी : निवडणुका जवळ आल्याने नागरिकांशी जवळीक साधण्याकरिता रोज नवनवे हातखंडे वापरताना सध्या इच्छुक उमेदवार दिसत आहेत. अगदी सकाळपासूनच प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोण आधुनिक श्रावण बाळ होत नागरिकांना तीर्थक्षेत्रे फिरवून आणीत आहे, तर कोणी शासनाने दिलेली आधार कार्ड स्मार्ट करून देण्याचा स्मार्ट प्रयत्न करताना दिसत आहे . प्रभागरचना बदलल्याने इच्छुकांसहित ज्यांनी नगरसेवकपद भोगलेय तेही खडबडून जागे झाले आहेत. जे पाच वर्षांत जेवढे जमले तेवढे काम केले. जी कामे राहिली असतील, ती कामे आता पुढे करून दाखवेन फक्त मलाच मत द्या, असे विनवीत आहेत. काही स्वयंघोषितांनी आपणच नगरसेवक होणार अशा आशयाचे फलक वाहनांवर व कार्यालयाबाहेर लावले आहेत. जागोजागी जनसंपर्क कार्यालये थाटून ठेवली असली, तरी कार्यालये मात्र ओस आहेत.गल्लीबोळातील डांबरी रस्ते चकाचक झाले. अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला आहे. पण काही ठिकाणच्या जुनाट समस्या ‘जैसे थे’ आहेत. पालिकेचे रुग्णालय नाही, क्रीडांगण नाही, काही ठिकाणी सार्वजनिक शौचालये नाहीत. आवश्यक तेथे गतिरोधक नाहीत. मरणारे मरतात, सिग्नल नाहीत. अवैध दारू विक्री,अवैध प्रवासी वाहतूक, ससेहोलपट, ड्रेनेज समस्या कधी सुटणार, या विवंचनेत मतदार आहेत.