श्रीकिशन काळे- पुणे : कोरोना विषाणू हा श्वसनावर हल्ला करतो आणि त्यामुळे रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. इटलीमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर नसल्याने हजारो रूग्णांचे प्राण गेले. भारतातदेखील व्हेंटिलेटर्स अपुरे आहेत. त्यामुळे महामारीच्या काळात देशासाठी स्वस्तात व्हेंटिलेटर बनविण्याचा ध्यास काही इंजिनिअरने घेतला. कमी पैशांत कमी जागेत मावणारा ‘श्वास’ व्हेंटिलेटर तयार करण्यात त्यांना यश आले. व्हेंटिलेटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला असून, लवकरच तो सरकारकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
औंध येथील ग्रिफिन रोबोटिक संस्थेतील इंजिनिअर एकत्र आले आणि त्यांनी हा व्हेंटिलेटर बनविला. त्यासाठी ग्रिफिन संस्थेचे संचालक अमेय कांदळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. अंबू बॅगचा वापर यात केला आहे. क्लाऊडवर माहिती साठविण्याची क्षमता आहे. रूग्णाची सर्व माहिती त्वरित कुठेही पाहता येते. डॅशबोर्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केला आहे. त्यामुळे हा अतिशय सुटसुटीत असा व्हेंटिलेटर सरकारच्या कामी येणार आहे.
.......श्वास’ व्हेंटिलेटरचे वैशिष्ट्येकॉम्पॅक्ट आणि कमी पैशांत तयारलहान आकार असल्याने कुठेही पटकन नेता येतोवापरण्यासाठी अतिशय सोपा आणि सुटसुटीतक्लाऊड कनेक्टिव्हिटी असल्याने सर्व माहिती कुठेही पाहता येतेग्रामीण भागात अधिक उपयोगीमॉंनिटर करायला ही अतिशय सोपा आहे........