पुणे : शहराच्या मध्यवस्तीत महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचा शोध घ्यावा लागतो. उपलब्ध स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता... जरा बरी स्वच्छता असलेल्या ठिकाणी पाच-दहा रुपये द्यावे लागतात... स्वच्छगृहामध्येच ठेकेदारांच्या माणसांनी ठिय्या मांडल्याने महिलांना दारातूनच परत फिरावे लागते.. मोबाईल टॉयलेट कुठेही दिसत नाहीत... अशी परिस्थिती आहे. तब्बल ६ हजार कोटींचे बजेट असलेल्या पालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची.पुण्याच्या गणेशोत्सवानिमित्त देश-विदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहरामध्ये येतात. यामध्ये गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी हजारो महिला रात्री उशिराप्रयत्न मुला-बाळांसह शहरामध्ये फिरत असतात. यामुळे या काळामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची मागणी वाढते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या वतीने मध्यवस्तीमध्ये पाहणी केली. कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती, तुळशीबाग, मंडई गणपती, गुरुजी तालीम परिसरामध्ये महिलांसाठी तीन ते चारच सार्वजनिक स्वच्छतागृहे आढळून आली. महिला स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली. प्रचंड दुर्गंधी, हात धुण्यासाठी वॉश बेसिन नाहीत की महिलांना पर्स, पिशवी अडकून ठेवण्यासाठी काही सुविधा ही नसल्याचे निदर्शनास आले. बहुतेक सर्व व्यवस्थापनासाठी पुरुषांची नियुक्ती केल्याचे निदर्शनास आले.
गणपती पाहण्यासाठी आलेल्या महिला भक्तांपुढे अपुऱ्या स्वच्छतागृहांचे विघ्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 13:40 IST
गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी हजारो महिला रात्री उशिराप्रयत्न मुला-बाळांसह शहरामध्ये फिरत असतात.
गणपती पाहण्यासाठी आलेल्या महिला भक्तांपुढे अपुऱ्या स्वच्छतागृहांचे विघ्न
ठळक मुद्देप्रचंड अस्वच्छता... पाच-दहा रुपये लागतात द्यावे...मोबाईल टॉयलेट दिसेनातचांगल्या दर्जाच्या व सुरक्षित सुविधा उपलब्ध नसल्याचे ‘लोकमत’ पाहणीमध्ये निदर्शनास