शास्तीच्या सक्तीऐवजी मूळ मिळकतकर भरण्यास मुभा
By Admin | Updated: January 1, 2015 01:17 IST2015-01-01T01:17:16+5:302015-01-01T01:17:16+5:30
शास्तीसह तिप्पट मिळकत कर भरणे अवघड जात असल्याने कोणीही शास्तीची मूळ रक्कमही भरण्यास तयार नव्हते. कर भरायचा असेल तर थकबाकी रकमेसह भरला तरच तो स्वीकरला जाईल,

शास्तीच्या सक्तीऐवजी मूळ मिळकतकर भरण्यास मुभा
पिंपरी : शास्तीसह तिप्पट मिळकत कर भरणे अवघड जात असल्याने कोणीही शास्तीची मूळ रक्कमही भरण्यास तयार नव्हते. कर भरायचा असेल तर थकबाकी रकमेसह भरला तरच तो स्वीकरला जाईल, असे सॉफ्टवेअर असल्याने शास्तीची रककम वगळून केवळ मिळकत कर भरताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, इच्छा असूनही मिळकत कर भरता येइर््ना,त्यावर तोडगा म्हणुन साफॅ्टवेअरमध्ये बदल करून तुर्तास शास्तीऐवजी मूळ मिळकत कर भरण्यास नागरिकांना मुभा दिली जाणार आहे.
महापालिकेने शास्तीच्या २०० कोटी तिप्पट रकमेपैकी ६७ कोटी २२ लाख रुपये वसूल केले आहेत. तिप्पट शास्ती भरण्यास नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीही विरोध केला ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने केवळ मूळ मिळकतकर वसूल करण्यास प्राधान्य दिले आहे. मिळकतकर भरणा करून घेणाऱ््या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
महापालिका गेल्या तीन वषार्पासून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मिळकतधारकांकडून तिप्पट मिळकतकर वसूल करत आहे.
महापालिका हद्दीत ४ लाख २५४ मिळकती नोंदणीकृत आहेत.
२००८ नंतरच्या बांधकामांना तिप्पट
दंड आकारण्यास सुरूवात केल्याने बहुतांशी मिळकतधारक शास्तीची रक्कम भरण्यास टाळाटाळ
करीत आहेत. शहरात सध्या ५४ हजार १०४ अनधिकृत मिळकतींना महापालिकेने तिप्पट दंड आकारणी लागू केली आहे. (प्रतिनिधी)
४ज्यांची करासंबंधीची कसलीही थकबाकी आहे, त्यांना ती थकबाकी भरल्याशिवाय मिळकत कर भरता येत नाही, ही सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचण आहे. लोकप्रतिनिधींनीही ही बाब आयुक्त राजीव जाधव यांच्यासह करआकारणी आणि करसंकलन विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. नागरिक कर भरण्यास तयार असून त्यांना सवलत द्या, सॉफ्अवेअरमध्ये बदल करा, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याची प्रशासनाने दखल घेतली आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी नागरिकांना सोईस्कर ठरेल. असे बदल करआकारणी सॉफ्टवेअरमध्ये करावेत, असे करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख भानुदास गायकवाड यांना सुचवले आहे.