प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:39 IST2020-11-22T09:39:23+5:302020-11-22T09:39:23+5:30

पुणे : विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीतील मतदान केंद्रांची प्रशासनाने शनिवारी पाहणी केली. निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निरीक्षक डॉ. ...

Inspection of polling stations by the administration | प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी

प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी

पुणे : विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीतील मतदान केंद्रांची प्रशासनाने शनिवारी पाहणी केली. निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निरीक्षक डॉ. निलिमा केरकटा यांनी हवेली तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी व अन्य अधिकारी होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनीही पाहणी केली. दोन्ही निवडणूकांचे मतदान १ डिसेंबरला आहे.

Web Title: Inspection of polling stations by the administration