विद्यार्थिनीच्या तक्रारीवर असंवेदनशील पोलिसाला धडा

By Admin | Updated: August 21, 2015 02:33 IST2015-08-21T02:33:33+5:302015-08-21T02:33:33+5:30

विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल न घेता तरुणाकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला चांगलाच धडा मिळाला

Insensitive Police Lessons on Student's Complaint | विद्यार्थिनीच्या तक्रारीवर असंवेदनशील पोलिसाला धडा

विद्यार्थिनीच्या तक्रारीवर असंवेदनशील पोलिसाला धडा

लोणावळा : विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल न घेता तरुणाकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला चांगलाच धडा मिळाला. तक्रार असलेल्या आरोपी तरुणानेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर या कॉन्स्टेबलला पकडण्यात आले.
आकाश अशोक भालेराव असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. एका मुलीने महाविद्यालयातील विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार दिली होती. भालेराव याने रविवारी त्या मुलाकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ७ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर त्या मुलाने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती. शहर ठाण्यासमोरील एका हॉटेलमध्ये पैसे देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सापळा रचला. दुपारी १२च्या सुमारास हॉटेल कर्मचारी सुनील बबन कदम (मूळ रा. पाली, रायगड) याला पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लायन्स पॉइंट परिसरात नागरिकांना त्रास देऊन पोलिस पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर १७ जानेवारी २०१४ ते ५ फेब्रुवारी २०१५ दरम्यान पाच वेळा येथील पोलिसांना आदेश बजावण्यात आले होते. पोलीस कर्मचारी एस. टी. बुर्ये व ए. बी. राऊत यांच्यावर निलंबिनाची कारवाई झाली होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिली.

Web Title: Insensitive Police Lessons on Student's Complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.