शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्वच्छतागृहात विजेच्या धक्क्याने महिलेच्या झालेल्या मृत्यूची चौकशी व्हावी, आ. डॉ. नीलम गो-हे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 19:02 IST

शहरातील कात्रज परिसरात एका महिलेचा २ जानेवारी २०१८ रोजी विजेच्या उघड्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याबद्दल चौकशी करावी व शहरात याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे - शहरातील कात्रज परिसरात एका महिलेचा २ जानेवारी २०१८ रोजी विजेच्या उघड्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याबद्दल चौकशी करावी व शहरात याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे.या घटनेसोबतच पुणे महापालिकेला आलेला तीन कोटी रुपयांचा आमदार निधी परत द्यावा लागल्याच्या बाबीचा उल्लेख करून याचा पाठपुरावा त्या मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. अशा प्रकारे आमदारांचा निधी परत जाणे म्हणजे एक प्रकारे आमदारांच्या विशेषाधिकारांचा भंगच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलेचा मृत्यू झाल्याबद्दलच्या घटनेवर त्या म्हणतात, '२ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील कात्रज परिसरात एक कष्टकरी व सर्वसाधारण कुटुंबातील महिला सायंकाळी घरी परतत असताना तिला नैसर्गिक विधीकरिता गेली असता तिथे असलेल्या विजेच्या उघड्या तारेच्या संपर्कात आल्याने ती जागेवरच मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत क्लेशकारक व दुःखदायक घटना असल्याचे सांगून पुण्यासारख्या शहरातही नागरिकांना वीज जोडणी करताना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.या घटनेची वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून त्वरित दखल घेतली गेली नसल्याचे नमूद करून या घटनेनंतर पाच दिवस होऊनही याचा अहवाल स्थानिक विद्युत निरीक्षकांनी का दिला नाही, याची विचारणा केली आहे. सदर महिलेच्या कुटुंबीयांना काही ठोस स्वरूपाची मदत करण्याची गरज व पुणे शहरात महिला स्वच्छतागृह पुरेशा व स्वच्छ प्रमाणात असावी, असे सांगून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या पुणे शहराच्या विविध प्रश्नावर झालेल्या बैठकीत शहरातील शाळांमध्ये असलेली स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावर लवकरच कार्यवाही केली जाईल या आश्वासनाची पूर्ती करण्यात आली नसल्याचे नमूद केले आहे.पुणे शहर व सर्व उपनगरांत महिलांसाठी पुरेशी व स्वच्छ स्वरुपाची स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत या करिता त्वरित पावले उचलण्यात यावीत. त्याचबरोबर महिलांना शहरात स्वच्छतागृहे उपलब्ध होण्याकरिता विविध  स्वयंसेवी संस्था, पेट्रोल पंप चालक संघटना यांच्यासमवेत समन्वयाच्या माध्यामातून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेPuneपुणे