अभिनव इंग्लिश मीडियमचा दहावीचा निकाल शंभर टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST2021-07-18T04:08:57+5:302021-07-18T04:08:57+5:30
१८ विदयार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून १७६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. शाळेतील सर्व शिक्षकांनी ...

अभिनव इंग्लिश मीडियमचा दहावीचा निकाल शंभर टक्के
१८ विदयार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असून १७६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. शाळेतील सर्व शिक्षकांनी दररोजच्या अभ्यासाबरोबर ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केल्याने त्याचबरोबर विविध परीक्षांचा सराव घेतल्याने आम्ही उत्तम प्रकारचे गुण मिळवू शकलो असे विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवून १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, खजिनदार ध्रुव जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.
१७ धनकवडी
यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत राजीव जगताप, निर्मोही जगताप, ध्रुव जगताप, वर्षा शर्मा व इतर.