शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

RBIच्या परीक्षेत मराठी मुलं नापास तर अमराठी मुलं पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 21:09 IST

 रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील 264 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये पास झालेल्या 300 हुन अधिक मराठी परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे. तर त्या जागी अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे. 

- राहुल गायकवाड

पुणे :  रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील 264 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये पास झालेल्या 300 हुन अधिक मराठी परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे. तर त्या जागी अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये परीक्षा घेण्यात आली. यातील पहिला आणि दुसरा टप्पा आईबीपीएस आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातून 666 परीक्षार्थींची निवड करण्यात आली. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2018 रोजी परीक्षार्थींना मराठी भाषा लिहिता वाचता येते का या बाबतची परीक्षा घेण्यात आली.(language profeciency test)या परीक्षेला प्रत्यक्षात किती गुण आहेत हेही सांगण्यात आले नव्हते. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून यात सुमारे 250 ते 300 मराठी भाषिक परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे. त्याचबरोबर हे परीक्षार्थीं  का नापास झाले या बाबत  विचारणा केली असता, कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. 

या परीक्षेला बसलेल्या पूनम आंबोरे म्हणाल्या पहिल्या दोन परीक्षांमध्ये मी चांगल्या गुणांनी पास झाले आहे. तिसरी परीक्षा हि फक्त उमेदवाराला मराठीचे किती ज्ञान आहे यासाठी होती. त्यात साधारण प्रश्न विचारण्यात आले होते. तरीही अनेक मराठी मुलांना यात नापास करण्यात आले आहे. तर त्या जागी अनेक अमराठी मुलांना पास करण्यात आले आहे. पहिल्या दोन परीक्षा पास झालो असताना मराठी भाषेच्या परीक्षेत आम्हाला नापास कसे करण्यात आले या बाबत कुठलीही माहिती देण्यात येत नाही. हा मराठी मुलांवर केलेला अन्याय आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते सतिश पानपट्टे म्हणाले, या परिक्षेत मोठ्या प्रमाणावर मराठी परीक्षार्थींना नापास करण्यात आले आहे. ज्या अमराठी परीक्षार्थींना मराठी बोलताही येत नाही असे काहीजन या परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे यात काहीतरी घोटाळा असल्याचा संशय येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या विरोधात लवकरत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीmarathiमराठी