शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Pune: जखमी वन्यजीवांना मिळाले हक्काचे घर; वन विभागाकडून बावधनमध्ये २२ एकरांवर उपचार केंद्र

By श्रीकिशन काळे | Updated: July 1, 2023 18:06 IST

राज्यभरातील जखमी प्राणी इथे आणणार...

पुणे : जखमी झालेल्या किंवा अनाथ असलेल्या वन्यप्राण्यांना आता पुण्यात हक्काचे घर मिळणार आहे. योग्य उपचारासह तिथे राहण्याची सोय देखील बाधवनच्या वन्य प्राणी उपचार केंद्रात करण्यात आली आहे. राज्यभरातील वन्यप्राण्यांची देखभाल देखील इथे होईल. त्यामुळे राज्यासाठी २२ एकरांमध्ये तयार केलेले हे एकमेव केंद्र आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला.

सध्या शहरीकरणामुळे वन्यप्राणी-मानव संघर्ष वाढला आहे. तसेच वाहनांच्या धडकेत व इतर अपघातांमध्ये वन्यजीव जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करणे हे काम सोपे नसते. त्यासाठी खास सोय करावी लागते. ही गरज लक्षात घेऊन पुणे वन विभागाच्या वतीने वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी ‘वन्य प्राणी उपचार केंद्रा’ची (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर- टीटीसी) निर्मिती केली आहे. बावधन येथील वन क्षेत्रात हे केंद्र साकारले आहे. त्यात अपंगत्व आलेल्या वन्यप्राण्यांची देखभाल आणि संगोपन होईल.

बऱ्याच ठिकाणी अपघातात वन्यजीव जखमी होतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ते पुण्यातील बावधन येथे आणणार आहेत. तिथे वैद्यकीय सेवा अद्ययावत केली आहे. पूर्वी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत होती. म्हणून खास २२ एकरांमध्ये नवीन सेंटर तयार केले आहे.  

काय असणार सेंटरमध्ये?- बावधनला २२ एकर वन क्षेत्रावर सेंटर- वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी १६ युनिट- पशुवैद्यकीय रुग्णालय व प्रशासकीय इमारतीची उभारणी- वन्यजीवांसाठी शवविच्छेदन कक्ष, बर्निंग शेडही तयार- जखमी प्राणी ठेवण्यासाठी खास पिंजरेही- वाघ व मोठ्या प्राण्यांसाठीही सोय

आज वनमंत्र्यांच्या हस्ते उद‌्घाटन बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्र लवकर सुरू  व्हावे, यासाठी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी खास प्रयत्न केले. त्यांनी सातत्याने यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे हे सेंटर ३० जूनपासून सुरू होत आहे. त्याचे उद‌्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ५ वाजता होत आहे.

टॅग्स :Puneपुणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्यMaharashtraमहाराष्ट्र