महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:26 IST2020-11-26T04:26:16+5:302020-11-26T04:26:16+5:30

\Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विवाहानंतर माहेरी आलेल्या महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून तिला जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार पर्वती दर्शन ...

Injured by throwing substance in woman's mouth | महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून केले जखमी

महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून केले जखमी

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विवाहानंतर माहेरी आलेल्या महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून तिला जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार पर्वती दर्शन येथे घडला आहे़

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अबुझर आय्याज तांबोळी (रा़ पर्वती दर्शन) याला अटक केली आहे़

याबाबत कसबा पेठेतील एका १८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़ फिर्यादी यांचे लग्न झाल्यानंतर त्या पतीसह माहेरी सुट्टीवर आल्या आहेत़ अबुझर याने त्यांना भेटण्याच्या बहाण्याने पर्वती दर्शन येथे बोलावले होते़ त्याप्रमाणे त्या आल्या़ फिर्यादी यांनी त्याला तू माझे मागे लागू नको़ आता माझे लग्न झालेले आहे़ असे समजावून सांगत होत्या़ त्यावेळी अबुझर याने ‘तुझे आपने आपपर गुरुर है ना, देख मै अभी तेरा गुरुर तोड देता हू’ असे म्हणून त्याने पाठीमागे हातात लपवलेले द्रव्य फिर्यादीच्या चेहऱ्यावर टाकून त्यांना जखमी केले़

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले की, आरोपीला आम्ही अटक केली आहे़ तो एअर कंडिशन दुरुस्तीचे काम करतो़ त्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर कोणते द्रव्य टाकले, हे समजून आले नाही़ त्याबाबत वैद्यकीय अहवाल मागवला आहे.

Web Title: Injured by throwing substance in woman's mouth