शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांचा शाळा उभारणीसाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:37 IST

शाळेत तब्बल २९ वर्षांनी ते एकत्र आले; मात्र शाळेत काहीच बदल नव्हता. तीच इमारत... फुटलेली कौले... त्यातून आत डोकावणारा सूर्यप्रकाश... हे पाहूुन त्यांचे मन हेलावले.

वडगाव निंबाळकर : शाळेत तब्बल २९ वर्षांनी ते एकत्र आले; मात्र शाळेत काहीच बदल नव्हता. तीच इमारत... फुटलेली कौले... त्यातून आत डोकावणारा सूर्यप्रकाश... हे पाहूुन त्यांचे मन हेलावले. पण, नुसते मन हेलावून दु:खी होणे व नंतर विसरून जाणे एवढ्यापुरतेच न राहता त्यांनी स्वत:च पुढाकार घेतला. आपणच शाळेला एक वर्गखोली बांधून देण्याचा निश्चय केला आणि बसल्या बैठकीत २ लाख ७० हजार रुपये जमवले. एका अर्थाने माजी विद्यार्थी मेळावा विद्यार्थ्यांपेक्षा शाळेसाठीच अधिक आनंददायी ठरला.वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील स्वातंत्र्य विद्यामंदिर शाळेत सन १९८९-९० या वर्षी दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महिनाभरापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाला. आठवणींच्या चर्चा, हास्यकल्लोळाने विद्यार्थी मेळावा घेण्याचे ठरले. मेळाव्यात शाळेच्या आठवणी प्रत्येकाच्या जागृत झाल्या. शाळेच्या दुरवस्थेबाबत चर्चा झाली. माजी विद्यार्थी काही तरी करू, असे ठरले.मेळाव्यात पन्नासहून अधिक माजी विद्यार्थी एकत्र जमले होते. प्रत्येकाने आपल्याला जमतील तेवढे पैसे दिले. अरविंद तांबे, वीरेंद्र शितोळे, संतोष निंबाळकर, राहुल ढोले, जीवन बनकर, गणेश फडतरे, सचिन खैरे, लालासो. जायपत्रे, सूरज पटेल, अनिता माने, कल्पना शिंदे यांच्यासह ३० जणांनी रोख रक्कम दिली. उर्वरित माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक वर्गखोली बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. विराज राजेनिंबाळकर, राजेंद्र गोलांडे, पांडुरंग पवार यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मेळाव्यात तत्कालीन शिक्षक एन. डी. फडतरे, डी. पी. बोबडे, पी. जे. पाखरे, के. एल. बनकर, एस. एस. सरोदे, डी. ए. बनकर, आर. बी. गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.प्रत्येकाकडून ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतमेळाव्यातील प्रत्येकाने आपल्याला जमतील तेवढे पैसे देण्याचे कबूल केले. काही जणांनी तर रोख रक्कम दिली. उर्वरित माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक वर्गखोली बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. एक समिती त्यासाठी नेमण्यात आली. ठराविक उत्साही विद्यार्थ्यांवर समितीची जबाबदारी सोपविण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळा