शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डीजेमुक्त ईदसाठी पुण्यातील मुस्लिम संघटनांचा पुढाकार; १००पेक्षा अधिक मंडळांनी केला डीजे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:35 IST

डीजे विरहीत ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ साजरी करण्यासाठी पुण्यातील जवळपास ४५ मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेतला असून मंडळांच्या कार्यकर्त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१०० पेक्षा अधिक मंडळांनी डीजे विरहीत ईद साजरी करण्याचा घेतला निर्णयडीजे लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, संघटनांच्यावतीने पोलिसांना देण्यात येणार पत्र

पुणे : डीजे विरहीत ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ साजरी करण्यासाठी पुण्यातील जवळपास ४५ मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेतला असून मंडळांच्या कार्यकर्त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. धर्मगुरु, मौलवी यांच्या समुपदेशनामुळे १०० पेक्षा अधिक मंडळांनी डीजे विरहीत ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला असून प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बंधुभाव-भाईचारा फाऊंडेशनचे सचिव यासीन शेख यांनी दिली. येत्या शनिवारी ईद साजरी होत आहे. या दिवशी दुपारी अडीच वाजल्यापासून मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. नाना पेठेतील मन्नूशाह मशिदीपासून सुरु होणारी ही मिरवणूक रविवार पेठेतील सुभानशाह दर्ग्यापाशी संपणार आहे. पुण्याच्या विविध भागांमधून मिरवणूका निघतात. या मिरवणुकांमध्ये स्पिकरच्या भिंती उभारलेल्या डीजेंवर गाणी वाजविली जातात. त्यामुळे समाजातील मान्यवरांनी स्पिकर वाजविणे इस्लाममध्ये नामंजूर असल्याने ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील विविध मशिदींमधील मौलवी, समाजातील जबाबदार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या मध्यस्तीने मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये जवळपास ४५ संघटना सहभागी झाल्या आहेत. सिरत कमिटी, इंडीयन मुस्लिम फ्रंट, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, मुस्लिम एकता फाऊंडेशन, भंडारशहा बाबा ट्रस्ट, बाबाजान दर्गा ट्रस्ट, बंधूभाव भाईचारा फाऊंडेशन आदी संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते अहमदभाई सय्यद यांच्या पुढाकाराने या उपक्रमाला सुरु वात झाली आहे. या संघटनांचे नदीम मुजावर, मुनव्वर कुरेशी, उस्मान तांबोळी, आमिन शेख, बंधूभाव-भाईचाराचे शब्बीरभाई शेख यांनी तरुणांशी संवाद साधून धर्माचा आणि कायद्याचा आदर करुन डीजे न लावण्याबाबत विनंती केली. शहरामध्ये आतापर्यंत जवळपास २५ पेक्षा अधिक बैठका घेण्यात आलेल्या आहेत. नुकतीच याबाबतीत आझम कॅम्पसमध्ये बैठक घेण्यात आली होती. गेल्या वर्षी बंधूभाव-भाईचारा फाऊंडेशनच्यावतीने असाच उपक्रम राबवित अडीच हजार गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले होते. कायद्याचा भंग करुन डीजे लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असे लेखी पत्रही सर्व संघटनांच्यावतीने पोलिसांना देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे