कोविड संकटात मदतीसाठी ‘बारामती चेंबर’ चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST2021-05-19T04:11:49+5:302021-05-19T04:11:49+5:30
बारामती : बारामती औद्यौगिक वसाहतीतील अनेक उद्योजक बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज या त्यांच्या शिखर संस्थेच्या माध्यमातून कोविड ...

कोविड संकटात मदतीसाठी ‘बारामती चेंबर’ चा पुढाकार
बारामती : बारामती औद्यौगिक वसाहतीतील अनेक उद्योजक बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज या त्यांच्या शिखर संस्थेच्या माध्यमातून कोविड रुग्णसेवेसाठी विविध स्वरूपाची मदत करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत.
बारामती चेंबर संचलीत आंत्रप्रुनर क्लबचे सभासदांकडून १०० पल्स आक्सीमिटर, १० थर्मल गन व एक वाटर कुलर बारामती परिसरातील शासकीय रुग्णालयांना देण्यासाठी क्लबचे चेअरमन शहाजी रणनवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्त केले. त्यानंतर पवार यांच्या हस्ते संबंधितांना हे प्रदान करण्यात आले. बारामती कॅटल फिड प्रा.लि. या कंपनीतर्फे २ टनाचे ३ एअर कंडिशनर, ५० फेस शिल्ड, प्रत्येकी १०००० सर्जिकल हेड कॅप, शूज कव्हर, ३ प्लाय मास्क, हँड ग्लोव्हज, ५०० डिसपोजेबल अॅप्रन, ५० लिटर सॅनिटायझर, १०० नग हँड वॉश असे ५ लाख किंमतीच्या विविध वस्तू आज बारामती कॅटल फिडचे एच . आर. प्रबंधक राहुल जाधव यांनी पवार यांच्या हस्ते मेडिकल कालेज कोविड सेंटर व महिला रुग्णालय यांना प्रदान करण्यात आले. यावेळी आणखी ५ लाख रुपये मेडिकल आक्सिजन प्रकल्पासाठी देण्याचे बारामती कॅटल फीडतर्फे घोषित करणेत आले. मेडिकल ऑक्सिजन जंबो सिलेंडर हाताळण्यासाठी योगीराज ट्रेलर ने बनविलेली ऑक्सिजन ट्रॉलीचेही अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रक़ारच्या २० ट्रॉली विविध शासकीय रुग्णालयांना पुरविणेचे बारामती चेंबरचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी यावेळी जाहिर केले. उद्योजक रमाकांत पाडोळे यांनी त्यांच्या लग्नाचे २५ व्या वाढदिवसानिमित्त २५ हजारां चा धनादेश कोवीड मदत फंडासाठी पवार यांच्याकडे सुपुर्त केला.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल पवार यांनी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज चे अध्यक्ष प्रमोद काकडे, बारामती कॅटल फिडचे चेअरमन सचिन माने , आंत्रप्रुनर क्लबचे अध्यक्ष शहाजी रणनवरे आणि योगिराज ट्रेलर चे संचालक अरुण म्हसवडे व रमाकांत पाडोळे यांचे कौतुक केले.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, डॉ. सदानंद काळे, डॉ. बापु भोई, डॉ. मनोज खोमणे, संभाजी नाना होळकर, उद्योजक सचिन सातव, बारामती चेंबर चे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, अरुण म्हसवडे, चंद्रकांत नलावडे, राहुल जाधव आदी उपस्थित होते.
—————————————
फोटोओळी—बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज च्या वतीने कोविड रुग्णसेवेसाठी विविध स्वरूपाची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली.
१८०५२०२१ बारामती—०१
——————————————