Initiation of Jainism by Godse family in Pune; Leaving a job worth lakhs of rupees and moving towards spirituality | पुण्यातील गोडसे कुटुंब घेणार जैन धर्माची दीक्षा; लाखो रुपयांची नोकरी सोडून अध्यात्माकडे वाटचाल

पुण्यातील गोडसे कुटुंब घेणार जैन धर्माची दीक्षा; लाखो रुपयांची नोकरी सोडून अध्यात्माकडे वाटचाल

पुणे : ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टी आणि जय महावीर व जय जिनेंद्रचा जयकार अशा आध्यात्मिक वातावरणात पुण्यातील मनीष भगवान गोडसे, सपना मनीष गोडसे त्यांचा मुलगा भाविक, मुलगी मानसी यांचे स्वारगेट येथील दादावाडी अहिंसा भवन येथे आगमन झाले. गोडसे परिवारातील चार जणांच्या दीक्षा समारोहानिमित्त या वेळी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

जर्मन डेनर्फास कंपनीतील लाखो रुपयांची नोकरी सोडून पुण्यातील मनीष गोडसे आणि त्यांच्यासोबत पत्नी सपना गोडसे व भाविक आणि मानसी यांनी जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. २२ फेब्रुवारी रोजी पालिताना येथील शत्रुंजय महातीर्थ येथे प. पू. आचार्य रवीशेखर सूरिश्वरजी म.सा.यांच्या हस्ते दीक्षा समारोह होणार आहे. यानिमित्त स्वारगेट येथील दादावाडी अहिंसा भवन येथे रविवारी (दि. २४) सकाळी सत्कार समारंभ आयोजित केला होता. या वेळी दादा वाड़ी ट्रस्ट व पुणे गौशाला पांजरापोल तर्फे गोडसे परिवाराचा तिलक, माला, फेटा, साल, मानपत्र  स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. मनीष भगवान गोडसे परिवार यांनी साध्वीजी रत्नरेखाश्रीजी महाराज यांच्या संपर्कात आल्यानंतर संसाराचा त्याग करून अध्यात्मासाठी आपले जीवन समर्पण करण्याचा निर्णय घेतला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Initiation of Jainism by Godse family in Pune; Leaving a job worth lakhs of rupees and moving towards spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.