इनामगावात बेकायदेशीर वाळूउपसा सुरुच
By Admin | Updated: January 11, 2015 23:46 IST2015-01-11T23:46:44+5:302015-01-11T23:46:44+5:30
इनामगाव (ता. शिरूर) येथील घोडनदीपात्रात बेसुमार वाळूउपसा सुरू असून याकडे कोणाचेही लक्ष नाही. घोडनदी पात्रात इनामगाव वांगदरी पुलाच्या बाजूला

इनामगावात बेकायदेशीर वाळूउपसा सुरुच
मांडवगण फराटा : इनामगाव (ता. शिरूर) येथील घोडनदीपात्रात बेसुमार वाळूउपसा सुरू असून याकडे कोणाचेही लक्ष नाही. घोडनदी पात्रात इनामगाव वांगदरी पुलाच्या बाजूला दिवसाढवळ्या खुलेआम वाळूउपसा जोरात असून, ना प्रशासनाचे लक्ष ना गावकऱ्यांचे! गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी नेते फक्त महसूल खात्याच्या पदाधिकाऱ्यांना फोन करतात, परंतु काहीही उपयोग होताना दिसत नाही. गावकरीही वाळूमाफीयांच्या या दादागिरीला कंटाळलेले दिसत आहेत.
घोडनदीचा वाळूचा निलाव झाला नसताना देखील या ठिकाणच्या नदीपात्रात रात्रंदिवस बेसुमार वाळुउपसा सुरु आहे. घोडनदीमध्ये शिरुरपुर्वभागात घोडधरणाच्या खालील नदीपात्रात पाणी आले आणि वाहुनही गेले . आलेले पाणी काही अंशी वाळुमाफियांनी केलेल्या खड्यात साचलेले आहे.हे खड्डे किती खोलवर केलेले आहेत यांचा अंदाज येत नाही त्यामुळे जर या खड्यात कपडे धुण्यासाठी अथवा
शाळकरी मुले पोहण्यासाठी गेल्यास मोठी जीवित हानी होवु शकते.
घोडनदीचे पात्र कोरडे पडलेले असल्याने या संधींचा फायदा वाळुमाफीयांनी घेतला आहे. नदीपात्रात जेसीबी ट्रॅक्टरने मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत. त्याचबरोबर नदीच्या कडेला मोठमोठे खड्डे केल्याने नदीच्या बाजुच्या शेतीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होवु शकतो. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जेसीबी पोकलेन च्या सहाय्याने वाळु उपसा सुरु आहे.सध्या या भागात पावसाचे प्रमाण कमी असुन नदीपात्रात पाणी नसल्याने वाळु माफीयांना चांगलीच संधी मिळाली आहे.नदीपात्रात मोठमोठे खड्डे करुन नदीपात्राची चाळण केली आहे. (वार्ताहर)