शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकांना हरताळ, चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 12:31 IST

केंद्रीय माहिती अधिकार कायदा लागू होऊन १२ वर्षे उलटली असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागनिहाय जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकाच केलेल्या नाहीत. याबाबत तक्रारी केल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यपाल, राज्य माहिती आयोग व उच्च शिक्षण संचालनालयाकडे तक्रारी केल्याने चौकशी सुरू विद्यापीठाने माहिती अधिकार कायद्यातील मूळ तरतूदच बसविली धाब्यावर

दीपक जाधव पुणे : केंद्रीय माहिती अधिकार कायदा लागू होऊन १२ वर्षे उलटली असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागनिहाय जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकाच केलेल्या नाहीत. याप्रकरणी एका नागरिकाने राज्यपाल, राज्य माहिती आयोग व उच्च शिक्षण संचालनालयाकडे याबाबत तक्रारी केल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या बेकायदेशीर प्रकाराला वाचा फुटली आहे.केंद्रीय माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी १५ जून २००६ पासून सुरू करण्यात आली. त्यानुसार शासकीय आस्थापनांनी विभागनिहाय सहायक जनमाहिती अधिकारी, माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांच्या नेमणुका करणे बंधनकारक होते. कायदा लागू झाल्यानंतर ४ महिन्यांच्या आत या नेमणुका करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने माहिती अधिकार कायद्यातील मूळ तरतूदच धाब्यावर बसविली आहे. नागरिकांना लगेच माहिती मिळावी यासाठी प्रत्येक विभागाला जनमाहिती अधिकारी मिळावा अशी तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर त्या विभागाचा प्रमुख हा अपिलीय अधिकारी म्हणून नेमला जाणे आवश्यक होते. मात्र पुणे विद्यापीठाने सरळसेवेच्या भरतीने दोन माहिती अधिकारी नेमले आहेत अन् कुलसचिव हे एकच अपिलीय अधिकारी असतील अशी बेकायदेशीर रचना केली आहे.विद्यापीठांमध्ये परीक्षा विभाग, वित्त विभाग, सभा व दप्तर विभाग, आरक्षण कक्ष, प्रशासन विभाग, सुरक्षा विभाग, स्थावर विभाग यासह ५२ शैक्षणिक अभ्यासक्रमांचे विभाग आहेत. या सर्व विभागांमध्ये जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जाणे कायद्यानुसार आवश्यक होते. राज्यातील इतर सर्व विद्यापीठांनी त्यानुसार या नेमणुका केल्या आहेत. जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुका न झाल्यामुळे नागरिकांना माहिती मिळण्यात असंख्य अडचणी येत आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थी, नागरिक यांनी माहिती मागितल्यानंतर तो अर्ज सरळ सेवेने भरलेल्या माहिती अधिकाऱ्यांकडे जातो. त्यानंतर ते संबंधित विभागाकडून माहिती मागवितात. त्यामुळे व्यवस्थित माहिती मिळत नाही. बहुतांश अपूर्ण माहिती दिली जाते. अनेकदा तर विभागाकडून माहिती मागविली आहे, ती मिळाली की तुम्हाला उपलब्ध करून देऊ, अशी उत्तरे अर्जदारांना देण्यात आली आहेत. कुलसचिव हे एकच अपिलीय अधिकारी असल्यामुळे वेळेवर अपील घेतले जात नाही. कुलसचिव हे विद्यापीठाचे प्रशासकीय प्रमुख आहेत; मात्र विद्यापीठातील सर्व अपिलांवर सुनावणी घेण्याची जबाबदारी त्यांनी घेतल्याने अपिलांच्या सुनावण्यातच त्यांचा बहुतांश वेळ जात आहे.  

काही उपकुलसचिव झटकताहेत जबाबदारीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागनिहाय जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुका न केल्याने काही उपकुलसचिव पूर्णपणे जबाबदारी झटकत आहेत. अगदी व्यवस्थापन परिषदेची बैठक किती तारखेला आहे याची माहितीही कुलसचिवांकडून घ्या असे सांगितले जात आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार विद्यापीठाने त्यांच्यावर जनमाहिती अधिकारीपदाची जबाबदारी न टाकल्याने हे घडत आहे.

इतर विद्यापीठांतील जनमाहिती अधिकारी
विद्यापीठजनमाहिती अधिकारीअपिलीय अधिकारीएकूण संख्या
मुंबई    ८३३ ८६
कोल्हापूर    ८५ ४  ८९
सोलापूर    २५ ७ ३२
नांदेड    २६३०
गोंडवाना    १६४ २०
औरंगाबाद    ७२१० ८२
नागपूर    ९६९६१९२
जळगाव    ४२ ०४ ४६
अमरावती    ७१०५ ७६
पुणे     ०२ ०३०३

ते वादग्रस्त परिनियम अद्याप उपलब्ध नाहीचसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद या बैठकांमधील निर्णय, इतिवृत्त व ठराव थेट कुणालाही दिले जाऊ नयेत असा परिनियम तयार केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे या परिनियमाची प्रत मागितली असता, संबंधित विभागाचे उपकुलसचिव रजेवर असल्याने त्याची माहिती घेऊन देतो, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो परिनियम नेमका काय आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे