अलर्ट ! फेसबुकवर तुम्हाला 'हा' मेसेज आला असेल तर सावधान, क्लिक करण्याआधी ही बातमी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 01:54 PM2017-12-26T13:54:52+5:302017-12-26T13:58:27+5:30

नेकांना कॉम्प्यूटर, लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये लॉग आऊट न करताच डायरेक्ट फेसबुक बंद करण्याची सवय असते. पण असणं करणं तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.

If you have received this message on Facebook, be careful, | अलर्ट ! फेसबुकवर तुम्हाला 'हा' मेसेज आला असेल तर सावधान, क्लिक करण्याआधी ही बातमी वाचा

अलर्ट ! फेसबुकवर तुम्हाला 'हा' मेसेज आला असेल तर सावधान, क्लिक करण्याआधी ही बातमी वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देफेसबुक मेसेंजरवर एक मेसेज सध्या फिरत आहेज्याप्रमाणे आपण एखाद्याला व्हिडीओ लिंक पाठवल्यानंतर जसं दिसतं तसाच हा मेसेज दिसतोहा कोणताही व्हिडीओ नसून व्हायरस आहे जो हॅकर्सकडून पसरवला जात आहे

मुंबई - तुम्ही जर फेसबुक वापरत असाल, तर फेसबुक मेसेंजरचाही नक्कीच वापर करत असाल. अनेकांना कॉम्प्यूटर, लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये लॉग आऊट न करताच डायरेक्ट फेसबुक बंद करण्याची सवय असते. पण असणं करणं तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज सध्या फिरत आहे. हा मेसेज आपल्या चॅट बॉक्समध्ये येतो. हा मेसेज एका व्हिडीओप्रमाणे असतो. ज्याप्रमाणे आपण एखाद्याला व्हिडीओ लिंक पाठवल्यानंतर जसं दिसतं तसाच हा मेसेज दिसतो. पण तुमच्या माहितीसाठी, हा कोणताही व्हिडीओ नसून व्हायरस आहे जो हॅकर्सकडून पसरवला जात आहे. या व्हायरसचं नाव 'डिग्माइन’ (Digmine) असं आहे. 

टोकियोमधील सायबर सुरक्षा एजन्सी ट्रेंड मायक्रोने यासंबंधी चेतावणी दिली आहे. सध्या हा व्हायरस दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, वेनेजुएला, युक्रेन, थायलँड, फिलीपिन्स या देशांमध्ये पसरला आहे. इतर देशांमध्येही हा व्हायरस जलगदतीने पसरण्याची शक्यता आहे. 

हा व्हायरस त्या युजर्साठी धोकादायक ठरु शकतो ज्यांना आपलं फेसबुक अकाऊंट लॉग आऊट न करता सोडून देण्याची सवय आहे. अनेकजण फेसबुक लॉग इन करायला लागू नये यासाठी अकाऊंट लॉग आऊटच करत नाहीत. अशा अकाऊंट्सची लिंक हा व्हायरस युजरच्या फेसबुक फ्रेंडला पाठवतो. यामुळे युजरचा मित्रदेखील अकाऊंटमध्ये लॉग इन करु शकतो. हा व्हायरस सध्या फक्त डेस्कॉपवरील वेबब्राऊजर व्हर्जनला टार्गेट करत आहे. त्यामुळे सध्या दुस-या प्लॅटफॉर्मवरुन फेसबुक वापरणा-यांना या व्हायरसचा धोका नाही. हा व्हायरस अशाप्रकारे बनवण्यात आला आहे की गरज पडल्यास तो अपडेटही केला जाऊ शकतो. 
 

Web Title: If you have received this message on Facebook, be careful,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.